राजकीय अनास्थेमुळेच शेतकरी आत्महत्या वाढीस - डॉ.सिल्वा लिबरहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 04:11 PM2019-11-09T16:11:22+5:302019-11-09T16:12:09+5:30
स्वित्झर्लंड येथील कृषी विशेषज्ज्ञ डॉ. सिल्वा लिबरहर यांच्याशी साधलेला संवाद...
- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : नापिकी आणि दुष्काळ यासारख्या नैसर्गिक आपत्ती आणि राजकीय पुढाऱ्यांचे उदासिन धोरणामुळे शेतकरी आत्महत्या वाढीस लागल्या आहेत. नव-उदारमतवाद हे देखील शेतकरी आत्महत्येचं प्रमुख कारण असल्याचे मत स्वित्झर्लंड येथील कृषी विशेषज्ञ डॉ. सिल्वा लिबरहर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. खामगाव येथे आल्या असता डॉ. सिल्वा लिबरहर यांच्याशी साधलेला हा संवाद...
प्रश्न - भारतीय शेतकऱ्यांसमोरील प्रमुख आव्हान/ संकट कोणते?
उत्तर - भारतीय शेतकºयांच्या उत्पादनापेक्षा उत्पादन खर्च अधिक ही एक प्रमुख समस्या शेतकºयांसमोरील असली तरी, भारतातील नव-उदारमतवाद हे प्रमुख आव्हान भारतीय शेतकºयांसमोर आहे. बदलत्या जीवनशैलीच्या ह्यपेचाह्णतून शेतकरी आत्महत्या वाढीस लागल्याचे आपले प्रामाणिक मत आहे. शेतकरी जगविण्याठी मानसिक आधाराची गरज आहे.
प्रश्न - शोध प्रबंध तयार करताना विदभार्लाच का प्राधान्य दिले?
उत्तर - विदभार्तील शेतकरी आत्महत्यांबाबत माध्यमांमध्ये प्रसारित बातम्या पाहताना आणि प्रकाशीत बातम्या वाचताना मन विचलित होत होतं. शेतकºयांच्या आत्महत्यांच्या शोध घेताना आत्महत्येचं प्रमाण जास्त असलेल्या विदर्भ प्रातांला प्राधान्य दिले.
प्रश्न - विदभार्तील समस्या जाणून घेण्यासाठी कोणते प्रयत्न केले?
उत्तर - विदभार्तील शेतकरी आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रथमता: विदभार्शी एकरूप होणं गरजेचं होतं. त्यामुळे शोधप्रबंध तयार करताना स्वित्झर्लंड हा मायदेश सोडून काही काळ विदभार्ची रहिवाशी झाले. तब्बल सहामहिन्यांपेक्षा जास्त कालावधी येथे घालविला. यासाठी सुदाम पवार, श्याम आठवले, राजेश राठोड यांनी आणि त्यांच्या परिवाराने घर उपलब्ध करून दिले. त्यामुळे येथील शेतकºयांशी जवळीक साधता आली, त्यांच्या समस्यांच्या मुळाशी जाण्यास मदत झाली. आस्मानी आणि सुलतानी संकटांमुळं विदभार्तील शेती आणि शेतकरी संकटात सापडला आहे. नैराश्य आणि कर्ज फेडण्याची विवंचना विदभार्तील शेतकरी आत्महत्ये मागील दुसरी महत्वाची कारणे आहेत. शेतकरी आणि शेतकरी कुटुबांना वाचविण्यासाठी एक चळवळ उभी राहणं गरजेचे आहे .
प्रश्न - शेतकºयांच्या समस्यांचा शोध घेताना कोणाची मदत झाली ?
उत्तर - भारतीय शेतकरी आणि त्यांच्या समस्यांबाबत माध्यमांमध्ये झळकणाºया बातम्यांमुळं ‘प्रति-रोध, मूल्य और किसान-वर्ग’ या विषयावर शोध निबंध तयार करण्याची कल्पना सुचली. त्यानंतर मार्गदर्शक डॉ. उर्स गेसर, प्रो. डॉ. अलरीके मुलर-बॉकर, प्रो.डॉ.आर. रामकुमार, टाटा इन्स्टीट्यूट आॅफ सोशल सायन्स, जयदीप हार्डीकर, विजय जावंधिया, रविकांत तुपकर, किशोर तिवारी, अविनाश काकडे, प्रेमसागर तासगांवकर, आदिते हेदू, मनोज पाटील, अनिकेत सत्तुवार, क्लाउडियो आणि स्टीफन कंबोन यांची मोलाची मदत झाली.