तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांचे उपोषण सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:30 AM2021-02-08T04:30:31+5:302021-02-08T04:30:31+5:30
हिवरा आश्रमः पेनटाकळी प्रकल्पाच्या कालव्यामुळे शेतकऱ्यांची शेतजमीन नापिक बनत आहे. याकरिता उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असून त्यासाठी स्वतः ...
हिवरा आश्रमः पेनटाकळी प्रकल्पाच्या कालव्यामुळे शेतकऱ्यांची शेतजमीन नापिक बनत आहे. याकरिता उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असून त्यासाठी स्वतः प्रयत्नशील असून मागण्या लवकर मान्य न केल्यास पेनटाकळी प्रकल्पात स्वतः उतरून आंदोलन करणार असल्याचे आश्वासन आ. संजय रायमूलकर यांनी दिले.
पेनटाकळी प्रकल्पात उपोषणास बसलेल्या शेतकऱ्यांची रविवारी आ. रायमूलकर,कृउबासचे सभापती माधवराव जाधव यांनी भेट घेतली. मेहकर तालुक्यातील मध्यम प्रकल्प असलेल्या पेनटाकळी धरणाच्या मुख्य कालव्याच्या ० ते ११ किलोमीटर पर्यंतच्या कालव्यातून पाझरणाऱ्या पाण्यामुळे ब्रम्हपुरी,दुधा,रायपूर सह या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सन २००३ पाणी कालव्याच्या पाण्यामुळे या परिसरातील शेती खारपाण पट्ट्यात बदलत असून दरवर्षी शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. रविवारी आ. संजय रायमूलकर यांनी उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेतली. शेतकऱ्यांचे कालवा पाझरामुळे होणाऱ्या नुकसानाबाबत जलसंपदा मंत्री यांच्याशी फोनवरून संपर्क साधून शेतकऱ्यांच्या व्यथा सांगितल्या. गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरातील शेतकरी पाईपलाईनव्दारे कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी करीत आहे. मात्र प्रशासनाच्या उदासीनेतचा फटाका शेतकऱ्यांना अजून सुध्दा बसत आहे. भविष्यात शेतीचे नुकसान टाळण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून शेतकरी पेनटाकळी धरणाच्या पाण्यात उपोषणाला बसले आहे. जोपर्यंत कालव्यातून पाईपलाईनव्दारे पाणी सोडल्या जात नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहील या निर्णयावर उपोषण करणारे शेतकरी ठाम आहे. यावेळी आ. रायामूलकर यांनी शेतकऱ्यांना उपोषण सोडविण्याबाबत संवाद साधला. मात्र शेतकरी उपोषणावर ठाम आहेत.