खते, बियाणे महागल्याने शेतकरी संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:46 AM2021-06-16T04:46:23+5:302021-06-16T04:46:23+5:30
परिसरात नगदी पीक म्हणून सोयाबीनची माेठ्या प्रमाणात पेरणी करण्यात येते. सोयाबीन आणि इतर सर्वच बियाणाच्या किमती महागल्या आहेत. मागील ...
परिसरात नगदी पीक म्हणून सोयाबीनची माेठ्या प्रमाणात पेरणी करण्यात येते. सोयाबीन आणि इतर सर्वच बियाणाच्या किमती महागल्या आहेत. मागील वर्षी शेतकऱ्याच्या शेतातील सोयाबीन पिकाची नासाडी झाली. अनेक शेतकऱ्यांना आपल्या घरी सोयाबीनचे बियाणे ठेवता आली नाही. त्यामुळे यावर्षी सोयाबीन बियाणांच्या किमती वाढलया आहेत. एक बॅग विकत घेण्याकरिता ३६०० ते ३७०० रुपये शेतकऱ्यांना मोजावे लागत आहेत. बाजारामध्ये आलेले इतर लोकल कंपन्यांची बियाणे खराब निघण्याचे भीतीमुळे शेतकरी वापरायला तयार नाहीत. काही कंपन्यांच्याच बियाणांना मागणी आहे. त्यामुळे या बियाणामध्ये भेसळ होण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने याबाबत मार्गदर्शन करण्याची गरज आहे. आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर बियाणे, खताच्या वाढत्या किमतीमुळे आणखी एक संकट ओढवले आहे. कृषी विभागाने जादा दराने बियाण्यांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी हाेत आहे.