शेतीच्या मशागतीचे दर वाढल्याने शेतकरी संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:46 AM2021-06-16T04:46:15+5:302021-06-16T04:46:15+5:30
मशागतीची कामे लवकर व्हावीत, यासाठी शेतकरी ट्रॅक्टरच्या साहाय्याने सर्व कामे करण्यावर भर देतात. त्यातच प्रत्येक शेतकऱ्याकडे शेतीचे क्षेत्र कमी ...
मशागतीची कामे लवकर व्हावीत, यासाठी शेतकरी ट्रॅक्टरच्या साहाय्याने सर्व कामे करण्यावर भर देतात. त्यातच प्रत्येक शेतकऱ्याकडे शेतीचे क्षेत्र कमी झाल्याने, बैलजोडीचा वापर करणे परवडत नाही. एका बैलजोडीची देखभाल करण्यासाठी स्वतंत्र माणसाची गरज असते. त्यामुळे नांगरटी, खते टाकणे, पेरणी आदी शेतीची कामे ट्रॅक्टरद्वारे केली जातात. सर्वच शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर नसले, तरी ज्यांच्याकडे ट्रॅक्टर नाही, असे शेतकरी भाडे देऊन ट्रॅक्टरद्वारे कामे करून घेतात. त्यामुळे वेळेचीही बचत होते. मात्र, डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्टरद्वारे शेतीची मशागत करून देणाऱ्या व्यावसायिकांनीही दर वाढविले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीचे पैसे देऊन मशागतीची कामे करून घ्यावी लागत आहेत. शासनाने शेतीच्या कामांसाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टरसाठी सवलतीच्या दरात डिझेल उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.