शेतकऱ्याच्या मुलीचे डाॅक्टर बनण्याचे स्वप्न भंगले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2020 03:03 AM2020-11-23T03:03:26+5:302020-11-23T03:03:39+5:30

स्वातीने गावातील श्री संत सोनाजी महाराज हायस्कुलमध्ये दहाव्या वर्गात ९७ टक्के तर १२ व्या वर्गात ८५ टक्के गुण मिळवले

The farmer's daughter's dream of becoming a doctor was shattered | शेतकऱ्याच्या मुलीचे डाॅक्टर बनण्याचे स्वप्न भंगले

शेतकऱ्याच्या मुलीचे डाॅक्टर बनण्याचे स्वप्न भंगले

Next

सोनाळा (जि. बुलडाणा):  वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर तिला एमबीबीएससाठी शिक्षणाची संधी उपलब्ध झाल्यानंतरही जातवैधता प्रमाणपत्र वेळेत उपलब्ध न झाल्याने गोवारी शेतमजूर कुटुंबातील मुलीचे डाॅक्टर बनण्याचे स्वप्न भंगले आहे. सोनाळा येथील पिंगळी वेशीवर राहत असलेले शेतकरी साहेबराव सोनोने यांची मुलगी स्वाती हिच्याबाबतीत हा प्रकार घडला.

स्वातीने गावातील श्री संत सोनाजी महाराज हायस्कुलमध्ये दहाव्या वर्गात ९७ टक्के तर १२ व्या वर्गात ८५ टक्के गुण मिळवले. गोवारी समाजातील असल्याने जातवैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी स्वाती सोनोने हिने १६ ऑगस्स्ट २०१९ मध्ये समितीच्या अमरावती कार्यालयाकडे अर्ज केला होता. प्रवेशाच्या वेळेपर्यंत तिला प्रमाणपत्र नाकारले नाही आणि दिलेही नाही. अनुसूचित जमाती जात वैधता प्रमाणपत्र समितीच्या कार्यालयात तीन दिवस चकरा मारूनही प्रमाणपत्र मिळाले नाही. तिचा एमबीबीएससाठी श्री भाऊसाहेब हिरे मेडीकल काॅलेज वर्धा येथे नंबर लागला. मात्र,  प्रमाणपत्र  न मिळाल्याने काॅलेजमध्ये तिला प्रवेश घेता आला नाही.

Web Title: The farmer's daughter's dream of becoming a doctor was shattered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.