शेतकरी कर्जमाफी जिल्हा बँकेच्या पथ्यावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 01:03 AM2017-11-10T01:03:46+5:302017-11-10T01:04:56+5:30

बुलडाणा : आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्याच्या दिशेने जिल्हा  केंद्रीय सहकारी बँक कसोशीने प्रयत्न करीत असतानाच शेतकरी  कर्जमाफीचाही बँकेला मोठा फायदा होणार आहे.

Farmer's debt was on the bank of the bank! | शेतकरी कर्जमाफी जिल्हा बँकेच्या पथ्यावर!

शेतकरी कर्जमाफी जिल्हा बँकेच्या पथ्यावर!

Next
ठळक मुद्दे१५ टक्के ठेवी वाढविण्याचे आवाहन एनपीएत झाली २१ टक्क्यांनी सुधारणा 

नीलेश जोशी। 
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्याच्या दिशेने जिल्हा  केंद्रीय सहकारी बँक कसोशीने प्रयत्न करीत असतानाच शेतकरी  कर्जमाफीचाही बँकेला मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे  सद्यस्थितीत  ६४.२१ टक्क्यावर असलेला बँकेचा एनपीए  (अनुत्पादक जिंदगी) मार्च २0१८ अखेर ३0 टक्क्यांच्या आस पास येणार आहे. त्यामुळे बँक पूर्वपदावर येण्याच्या दृष्टीने चांगले  संकेत आहेत. केंद्राची मदत आणि बँकींग परवाना मिळताना  प्रामुख्याने बँकेचा एनपीए दोन वर्षाच्या आत ५0 टक्क्याच्या  खाली आणण्याचे बँकेला उद्दिष्ट देण्यात आले होते.
केंद्र सरकारने बँकेला दिलेली मदत ही अनुदान स्वरुपात न देता  ती कर्जस्वरुपात दिली होती. दिलेली ही मदत अनुदान स्वरुपात  परावर्तीत करण्यासाठी बँकेला दोन वर्षाच्या आत एनपीए ५0 ट क्क्यांच्या खाली आणने आणि किमान १५ टक्क्यांनी ठेवीचा रेशो  वाढवावा, अशी अटक टाकण्यात आली होती. त्यादृष्टीने बँकेने  प्रयत्न चालवले असून, ३१ मार्च २0१६ रोजी बँकेचा एनपीए हा  तब्बल ८५.८६ टक्के होता तो मार्च २0१७ मध्ये ६४.२१ टक् क्यांवर आणण्यात बँकेला यश आले आहे. 
जवळपास २१ टक्क्यांनी यात बँकेने सुधारणा केली आहे.  पहिल्या वर्षी एनपीए २५ टक्कय़ांनी सुधारणे गरजेचे होते; पण या  ठरवून दिलेल्या उद्दिष्ठाच्या जवळपास प्राधिकृत समिती  पोहोचली आहे.
अकृषक क्षेत्रात अव्यावहारिक स्तरावर वितरित केलेल्या  कर्जामुळे जिल्हा केंद्रीय सहकारी बँक डबघाईस आली होती.  त्यामुळे निकषावर आधारित चार टक्के तरलतेचे प्रमाण बँकेला  राखण्यात अपयश आले होते. केंद्र सरकारने मदतीची तयारी  दर्शवली होती; पण न्यायालयीन प्रकरणामुळे त्यात अडचण येत  होती. अखेर मदत मिळाल्यामुळे खंडपीठातील प्रकरण निकाली  निघून १३ मे २0१६ ला बँकिंग परवाना मिळाला. आता बँकेची  तरलता ही ९ टक्के आहे. त्यामुळे अडचण नाही. 
केंद्र सरकारने बँक पूर्वपदावर आणण्यासाठी ५४ कोटी ८३  लाख, राज्य शासनाने १३८ कोटी ४५ लाख आणि नाबार्डने  १३.७२ कोटी रुपयाची मदत बँकेला केली होती.  जवळपास  ६९.९१ कोटी रुपयांची अतिरिक्त मदत बँकेला  मिळाली. २0७  कोटी रुपयांच्या घरात ही मदत जाते.
दुसरीकडे शेतकरी कर्जमाफीचीही रक्कम बँकेतील त्यांच्या खा त्यात जमा होत असल्याने बँकेकडील ठेवीही वाढणार आहेत.  त्याचा फायदा बँकेला मिळून बँकेची अनुत्पादक जिंदगी ही मार्च  २0१८ मध्ये ३0 टक्क्यांच्या आसपास राहील. हे बँक पूर्वपदावर  आणण्याच्या दृष्टीने शुभसंकेत आहेत.

ठेवी ५५२ कोटीवर
१५ टक्क्यांच्या रेशोमध्ये ठेवी वाढविणे आवश्यक होते. तुलनेत  कमी ठेवी बँकेला मिळाल्या आहेत. ५१९ वरून या ठेवी ५२१  कोटीवर गेल्या आहेत. त्यामुळे  बँकेप्रती शेतकरी व  नागरिकांमध्ये विश्‍वास वाढत आहे.

नवीन ठेवी लगोलग करतात परत
बँक पूर्वपदावर येत असली तरी जनमानसात संभ्रम आहे.  त्यामुळे बँकेत नवीन ठेवी ठेवणार्‍यांना त्यांनी ठेव मागितल्यास ती  लगोलग परत दिल्या जाते. यामुळे बँकेविषयी आपुलकीची  जाणीव ग्राहकांमध्ये रुजतेय.  जुन्या ठेवीतून संबंधिताना आजार पण, लग्न, शैक्षणिक कारणासाठी रक्कम दिल्या जात  असल्याचेही बँकेचे कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक खरात  यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

बँंकेचे होणार सक्षमीकरण
रिझर्व बँंकेने तोट्यातील बँकांचे विलीनिकरण करण्यास  परवानगी दिलेली नाही. त्यामुळे या बँकांच्या सक्षमीकरणाला  प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यासाठी समितीही नियुक्त करण्यात  आली असून याचा जिल्हा बँकेला येत्या काळात फायदा  होण्याची शक्यता आहे. व्यवस्थापन खर्चातही बँकेला एक टक्के  कपात करावी लागणार आहे.

२0१८ चा रिझल्ट अधिक सकारात्मक
जिल्ह्यातील दोन लाख ५0 हजार ७४५ शेतकरी कुटुंब  कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. जवळपास १८ कोटी रुपयेही  शेतकर्यांच्या खात्यात जमा झाल्याचे सांगण्यात येत आहेत. या तील बहुतांश रक्कम ही शेतकर्यांची बँक अशी ओळख  असलेल्या जिल्हा बँकेत जमा होणार आहे. त्यामुळे मार्च २0१८  चे रिझल्ट बँकेसाठी अधिक सकारात्मक राहणार असल्याचे  कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक खरात म्हणाले.

Web Title: Farmer's debt was on the bank of the bank!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.