दसर्यापूर्वी शेतकर्यांना कर्जमुक्त करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 12:20 AM2017-09-12T00:20:28+5:302017-09-12T00:21:14+5:30
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्रभर वेगवेगळी आंदोलने करून जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. बुलडाणा येथे दुपारी १ वाजता खा. प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वामध्ये खासदार कार्यालय येथून शिवसैनिक व पदाधिकार्यांनी रॅली काढून शेतकर्यांची दसर्यांच्या आत कर्जमुक्ती करा, रब्बी हंगामासाठी पीक कर्ज द्या, अशा घोषणा देत खासदार कार्यालय संगम चौक, जयस् तंभ चौक, अशी जिल्हाधिकार्यांवर धडकली या आंदोलनाला मोर्चाचे स्वरूप आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्रभर वेगवेगळी आंदोलने करून जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. बुलडाणा येथे दुपारी १ वाजता खा. प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वामध्ये खासदार कार्यालय येथून शिवसैनिक व पदाधिकार्यांनी रॅली काढून शेतकर्यांची दसर्यांच्या आत कर्जमुक्ती करा, रब्बी हंगामासाठी पीक कर्ज द्या, अशा घोषणा देत खासदार कार्यालय संगम चौक, जयस् तंभ चौक, अशी जिल्हाधिकार्यांवर धडकली या आंदोलनाला मोर्चाचे स्वरूप आले होते.
खासदार प्रतापराव जाधव यांनी शेतकर्यांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधामध्ये सरकारवर तोफ डागली व शिवसेना नेहमीच शेतकर्यांच्या पाठीशी होती व राहणार आहे. शेवटच्या श्वासापर्यंत शेतकर्यांसाठीच लढत राहू, असे म्हण त शेतकर्यांच्या विविध प्रश्नांवर प्रकाश टाकला. व जिल्हाधिकार्यांकडे एक शिष्टमंडळ जाऊन निवेदन दिले. व जिल्हाधिकार्यांशी चर्चा केली. यावेळी या आंदोलनामध्ये आ.डॉ. संजय रायमुलकर, जिल्हा प्रमुख जालिंधर बुधवत, जिल्हा प्रमुख दत्ता पाटील, चिखली संपर्क प्रमुख भरतकुमार नाईकवाडी, युवा सेना जिल्हाप्रमुख ऋषिकेश जाधव, संजय गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हय़ात अत्यल्प पावसामुळे भविष्यात पाणीटंचाई व चाराटंचाईचे संकट ओढवणार आहे पाणी व चारा टंचाईवर मात करण्याच्या उपाययोजना आतापासून कार्यान्वित कराव्यात तसेच शेतकर्यांच्या बांधावर जाऊन पिकांचे सर्वेक्षण करावे व बुलडाणा जिल्हय़ात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या कर्जमाफीचा लाभ शेतकर्यांना नवरात्रापूर्वी देण्यात यावा रब्बी हंगामाचे पीक कर्ज तत्काळ वाटप सुरू करण्यात यावे. अन्यथा या मागण्या मान्य झाल्या नाही तर जिल्हाभर उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना स्टाइलने आंदोलन करण्या त येईल. यावेळी आंदोलनामध्ये डॉ. मधुसूदन सावळे, लखन गाडेकर, चंदा बढे, सिंधू खेडेकर, वसंत भोजने, शांताराम दाने, विजय जायभाये, संतोष लिप्ते, राजेंद्र गाडेकर, बाबुराव मोरे, सुरेश वाळूरकर, बळीराम मापारी, सतीश काळे, दादाराव खार्डे, भोजराज पाटील, विजय साठे, संतोष डिवरे, गजानन वाघ, रमेश पाटील, रवी झाडेकर, अनिल मामरकर, कपिल खेडेकर, शिवाजी देशमुख, धनo्रीराम शिंपणे, भगवान खंदारे, अरुण अग्रवाल, किशोर नवले, नीलेश राठोड, अनिल जगताप यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.