पीककर्ज वाटपासाठी शेतकऱ्यांचा बँक अधिकाऱ्यांना घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 04:49 PM2019-05-17T16:49:08+5:302019-05-17T16:49:59+5:30
खामगाव: दुष्काळ ग्रस्त बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्ज वाटप करण्यात यावे, या मागणीसाठी काँग्रेसच्यावतीने बँक अधिकाऱ्यांना शुक्रवारी घेराव घालण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: दुष्काळ ग्रस्त बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्ज वाटप करण्यात यावे, या मागणीसाठी काँग्रेसच्यावतीने बँक अधिकाऱ्यांना शुक्रवारी घेराव घालण्यात आला.
जिल्हयात पीक कजार्साठी १७७३ कोटी रुपयांचे विविध बँकांना उद्दीष्ट देण्यात आले. मात्र, १५ मे पर्यंत केवळ ३४ कोटी म्हणजे २ टक्के वाटप झाले असून ९८ टक्के पीक कर्ज वाटप होणे बाकी आहे. शेतकरी हिताच्या दृष्टीकोनातून ही बाब अतिशय धक्कादायक असून शासन आणि बँक प्रशासन शेतकºयांच्या बाबतीत किती उदासिन व असंवेदनशिल असल्याचा आरोप माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी केला.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने शुक्रवारी शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्जाचे वाटप करण्यात यावे या मागणीसाठी नांदुरा रोडवरील बँक आॅफ महाराष्ट्र, बँक आॅफ बडौदा या राष्ट्रीयकृत बँकांसमोर बँक अधिकाऱ्यांना घेराव घालून आंदोलन करण्यात आले. यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. सदानंद धनोकार, अमरावती विभागाचे समन्वयक धनंजय देशमुख, बाजार समितीचे संचालक श्रीकृष्ण टिकार, विलाससिंग इंगळे, काँग्रेसचे जेष्ठ नेते विश्वपालसिंह जाधव, महिला तालुका अध्यक्षा भारतीताई पाटील, शहर अध्यक्षा सुरजीतकौर सलुजा, माजी नगराध्यक्षा सरस्वतीताई खासने, न.प.कॉंग्रेस पक्षनेता अर्चनाताई टाले, पं. स. सदस्य मनिष देशमुख,युवक कॉंग्रेसचे बुलडाणा लोकसभा महासचिव तुषार चंदेल आदींची प्रमुख उपस्थिती होती.