शेतकऱ्यांपुढे मदतीसाठी अडथळ्यांची शर्यत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 02:42 PM2019-11-02T14:42:51+5:302019-11-02T14:43:06+5:30

अर्ज भरण्यापासून फोटो अपलोड करण्याचे कामही शेतकºयांना देण्यात आल्याने शेतकरी गोंधळले आहेत.

Farmers have to cross barriers for help | शेतकऱ्यांपुढे मदतीसाठी अडथळ्यांची शर्यत

शेतकऱ्यांपुढे मदतीसाठी अडथळ्यांची शर्यत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान झाल्यानंतर आता मदतीसाठी अडथळ्यांची शर्यत सुरू झाली आहे. पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांनाच सर्वेच्या कामाला जुंपण्यात आलेले आहे. अर्ज भरण्यापासून फोटो अपलोड करण्याचे कामही शेतकºयांना देण्यात आल्याने शेतकरी गोंधळले आहेत. नुकसानाचे अर्ज भरण्याची ही प्रक्रिया रविवारपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसाने सोयाबीन, ज्वारी, कपाशी, मका या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जिल्ह्यात ३ लाख ६१ हजार ५३७ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरणी झालेली आहे. परंतू सध्या पावसाने सोयाबीनला कोंब आले आहेत. सुडी लागलेल्या सोयाबीनला बुरशी आलेली दिसून येत आहे. ज्वारी, मका पिकावरही मोड आल्याने शेतकºयांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. कपाशीचे बोंडही पावसाने खराब झालेले आहेत. जिल्ह्यात सोयाबीन उत्पादक शेतकरी सर्वाधिक आहेत. सोयाबीनचा हंगाम अंतीम टप्प्यात असताना पावसाचा तडाखा या पिकाला बसला. त्यामुळे पीक घरात येण्यापूर्वीच हातचे गेले. या नुकसानामुळे शेतकरी चिंताग्रस्त असताना आता मदतीसाठी शेतकºयांना लढा द्यावा लागत आहे. खरीप हंगामापासून पीके जगविण्यासाठी कष्ट करणारा शेतकरी आता नुकसान झाल्याने मदतीसाठी धडपड करीत आहे. सध्या परतीच्या पावसाने झालेलया नुकसानाचे पंचमाने करण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतू कागदपत्रांची जुळवा-जुळव करण्यात शेतकरी मेटाकुटीस आला आहे. त्यात पीक विमा काढलेल्या शेतकºयांना नुकसान झालेल्या पिकाबाबत अर्ज भरण्यासाठी ३१ आॅक्टोबरपर्यंत मुदत दिली होती. परंतू या मुदतीमध्ये शेतकºयांना सुट देण्यात आली आहे. त्यामुळे सध्या तालुका कृषी कार्यालयांमध्ये शेतकºयांची गर्दी होत आहे. या अर्जाबरोबर नुकसान झालेल्या पिकाचा फोटो मागविण्यात आलेला आहे. परंतू बहुतांश शेतकºयांना फोटो काढण्यासारखे मोबाईल उपलब्ध नाहीत. कागदपत्र वेळेवर उपलब्ध होऊ शकत नाहीत. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
 
पावसाने झालेल्या पीक नुकसानाचे पंचनाम सध्या सुरू आहेत. पीक विमा काढलेल्या शेतकºयांना सुरूवातीला ३१ आॅक्टोबरपर्यंत अर्ज मागविले होते. परंतू सध्याही अर्ज स्विकारण्यात येत आहेत. रविवारपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल.
- नरेंद्र नाईक,
जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी, बुलडाणा.

Web Title: Farmers have to cross barriers for help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.