आधार लिंकसाठी शेतकऱ्यांना बँकेत मोजावे लागताहेत पैसे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 01:57 PM2020-01-11T13:57:19+5:302020-01-11T13:57:26+5:30

बँक आॅफ महाराष्ट्र शाखेमध्ये आधार लिंक करण्यासाठी आलेल्या प्रत्येक शेतकºयाकडून १७७ रुपये भरून घेण्यात येत आहेत.

Farmers have to pay in bank for Aadhaar link! | आधार लिंकसाठी शेतकऱ्यांना बँकेत मोजावे लागताहेत पैसे!

आधार लिंकसाठी शेतकऱ्यांना बँकेत मोजावे लागताहेत पैसे!

Next

- ब्रम्हानंद जाधव  
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: कर्जमाफीच्या चौकटीत बसणाºया एक लाख ९८ हजार १५९ शेतकऱ्यांपैकी सुमारे १९ टक्के शेतकºयांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक संलग्न नाहीत. त्यामुळे सध्या बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करण्याच्या कामाला वेग आला आहे. परंतू वेगवेगळ्या बँकाचे वेगवेगळे नियम शेतकºयांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. बँकनिहाय नियमांमध्येही तफावत असून, बँकेत आधार लिंकसाठी शेतकºयांना पैसेही मोजावे लागत आहेत.
शेतकºयांना दोन लाख रुपयापर्यंत सरसगट कर्जमाफी देण्याचा महाविकास आघाडी सरकारच्या निर्णय आहे. या कर्जमाफीचा जिल्ह्यातील जवळपास एक लाख ९८ हजार १५९ शेतकºयांना लाभ होणार आहे. त्यासाठी सुमारे १३०० कोटी रुपयांच्या आसपास आकडा जाऊ शकतोे. सध्या कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी विविध प्रशासकीय बाबींची पुर्तता करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये सर्वप्रथम योजनेचा लाभ मिळविण्यासाठी शेतकºयांचे पीक कर्ज घेत असलेल्या बँक खात्याशी आधार क्रमांक संलग्न संलग्न असणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील एकूण लाभार्थ्यांपैकी ३७ हजार शेतकºयांचे बँक खाते आधारकार्डशची संलग्न नाहीत. त्यामुळे बँक खात्याला आधार कार्ड जोडणीचे काम सध्या प्रत्येक बँकेत सुरू आहे. यासंदर्भात बँकांच्या प्रतिनिधींना आवश्यक त्या सुचना वरिष्ठस्तरावरून करण्यात आल्या आहेत. परंतू शेतकरी बँकामध्ये गेल्यानंतर आधार लिंकसाठी त्यांना विविध अडचणी येत आहेत. काही बँकामध्ये तर आधार लिंकचे पैसेही मागितले जात आहेत. मेहकर तालुक्यातील घाटबोरी येथील बँक आॅफ महाराष्ट्र शाखेमध्ये आधार लिंक करण्यासाठी आलेल्या प्रत्येक शेतकºयाकडून १७७ रुपये भरून घेण्यात येत आहेत. मात्र इतर बँकेमध्ये असे पैसे न भरता आधार लिंक केले जाते. त्यामुळे शेतकºयांमधेही गोंधळ निर्माण होत आहे. अनेक शेतकरी बँक कर्मचाºयांशी सुद्धा वाद घालतात. प्रत्येक बँकेत वेगवेगळे नियम असल्याने शेतकरी अडचणीत सापडत आहेत. यासंदर्भात जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक मेहेर यांच्याशी संपर्क साधला असता वेगवेगळ्या अ‍ॅक्टीव्हिटी असतात, त्यानुसार ते दर आकारले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

ग्रामपंचायत स्तरावर याद्या
आधार क्रमांक संलग्न नसलेल्या शेतकºयांच्या याद्या काही ग्रामपंचायतमध्ये लावण्यात आलेल्या आहेत. तसेच बँकनिहाय सुद्धा याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. ह्या याद्या पाहून बरेश शेतकरी आता आधार क्रमांक बँक खात्याला लिंक करण्यासाठी बँकेत गर्दी करत आहेत.


सन्मान योजनेचा लाभ न मिळालेले ४७ हजार ९९९ शेतकरी
जिल्ह्यात चार लाख ९१ हजार १५८ शेतकरी आहेत. त्यापैकी ३१ मार्च २०१९ दरम्यान तीन लाख एक हजार १६७ शेतकरी हे किसान क्रेडीट कार्ड धारक शेतकरी होते. जिल्ह्यातील एक लाख ९८ हजार १५९ शेतकरी हे थकबाकीदार होते. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत पात्र ठरलेल्या मात्र त्याचा लाभ मिळू न शकलेल्या शेतकºयांची संख्या ही ४७ हजार ९९९ होती.

Web Title: Farmers have to pay in bank for Aadhaar link!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.