शेतजमिनीचे आरोग्य बिघडले

By admin | Published: April 16, 2015 01:11 AM2015-04-16T01:11:45+5:302015-04-16T01:11:45+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील शेतजमिनीमध्ये नत्राचे प्रमाण कमी झाले, तर पालाशचे प्रमाण वाढले.

Farmer's health worsened | शेतजमिनीचे आरोग्य बिघडले

शेतजमिनीचे आरोग्य बिघडले

Next

बुलडाणा : शेतजमिनीची सुपीकता दिवसेंदिवस घसरत आहे. चांगल्या पिकांसाठी नत्र, स्फुरद आणि पालाशचे १.२६ ते १.७५ हे मध्यम प्रमाण योग्य समजले जाते; मात्र गत १0 वर्षांच्या माती परीक्षण अहवालानुसार, जिल्ह्यातील शे तजमिनीत सरासरी नत्र 0.८0, स्फुरद 0.९१ इतके असून, पालाश आवश्यकतेपेक्षा जास्त म्हणजे २.८३ इतकेच आढळले आहे. रासायनिक खतांचा अवाजवी व असंतुलित वापरामुळे जमिनीचे आरोग्य बिघडत आहे. यासंदर्भात सु पीकता निर्देशांकाच्या वेिषणानुसार, माती परीक्षणात मातीमधील नत्र, स्फुरद व पलाश हे 0.५0 ते 0.७५ प्रमाणात आढळल्यास त्याचे वर्गीकरण अत्यंत कमी नोंदविण्यात येते तसेच 0.७६ ते १.२५ हे प्रमाण आढळल्यास वर्गीकरण कमी असते. त्यामुळे कुठल्याही पिकांच्या लागवडीसाठी १.२६ ते १.७५ हे मध्यम प्रमाण योग्य समजले जाते. पिकाविषयी शेतकर्‍यांमध्ये जागृती निर्माण करणे व जमिनीचे आरोग्य शाश्‍वत स्वरूपात जतन करता यावे, यासाठी दरवर्षी शेतजमिनीतील कृषी विभागाकडून मातीपरीक्षण केले जाते. त्यानुसार खरीप, रब्बी हंगाम, नगदीपिके, फळ िपकांसाठी कृषी विद्यापीठाची शिफारस जाहीर करून कुठल्या पिकांसाठी कोणत्या खताची किती मात्रा वापरावी, हे ठरविले जाते; मात्र गत काही वर्षात मातीपरीक्षण अहवालानुसार, जमिनीची सुपिकता घटत आहे.

*मातीपरीक्षणात अडचणी

      २0१५-१६ च्या खरीप व रब्बी हंगामासाठी जिल्ह्यातील काही गांवामध्ये माती परीक्षण सुरू झाले; मात्र सततच्या अवकाळी पावसामुळे शेतजमीन अद्यापही ओल धरून आले. त्यामुळे शेतातील मातीची गुणवत्ता ढासळत आहे. परिणामी मातीचे योग्य नमुने घेताना अडचणी निर्माण होत आहेत.

*३३ गावांत झाले मातीपरीक्षण

     २0१४-१५ साठी बुलडाणा उपविभागातून ११ गावे, खामगाव उपविभागातून १५ आणि मेहकर उपविभागातून सात अशा ३३ गावांतील वहितीखालील क्षेत्राच्या प्रति १0 हेक्टर क्षेत्रातून एक या प्रमाणे ३४६७ मृदा नमुन्याची तपासणी राष्ट्रीय कृषिविकास योजना आणि अन्न सुरक्षा अभियान योजनेमधून करण्यात आली होती.

Web Title: Farmer's health worsened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.