शेतकऱ्यांची बचत खाती केली हाेल्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:40 AM2021-08-17T04:40:02+5:302021-08-17T04:40:02+5:30
डोणगाव : कर्ज थकलेल्या शेतकऱ्यांच्या बचत खात्यांना बँकांनी हाेल्ड केल्याने डाेणगावसह परिसरातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. बँकांनी हाेल्ड ...
डोणगाव : कर्ज थकलेल्या शेतकऱ्यांच्या बचत खात्यांना बँकांनी हाेल्ड केल्याने डाेणगावसह परिसरातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. बँकांनी हाेल्ड तातडीने काढावे, अन्यथा आंदाेलन करण्याचा इशारा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुनराव वानखेडे यांनी दिला आहे. डाेणगाव परिसरातील अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. त्यामुळे ते पीक कर्ज भरू शकलेले नाही़त. त्यांचे खाते बॅंकांनी हाेल्ड केले आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मानधन मिळत असून, हे पैसे बचत खात्यामध्ये जमा होत आहेत. इतरही पैसे खात्यामध्ये आहेत. या खात्याला तालुक्यातील बँकांनी होल्ड लावून खात्यातील शिल्लक रक्कम देण्यास नकार दिल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे मेहकर तालुक्यातील बँकांना त्वरित आदेश करून शेतकऱ्यांच्या खात्यातील शिल्लक रक्कम शेतकऱ्यांना देण्यात यावी, अशी मागणी अर्जुनराव वानखडे यांनी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास आंदाेलन करण्याचा इशाराही वानखेडे यांनी तहसीलदारांना १२ ऑगस्ट राेजी दिलेल्या निवेदनात दिला आहे.