अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 06:25 PM2019-03-04T18:25:21+5:302019-03-04T18:25:38+5:30
मोताळा : अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास तालुक्यातील कोथळी शिवारात घडली. जखमीवर बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे
मोताळा : अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास तालुक्यातील कोथळी शिवारात घडली. जखमीवर बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे.
तालुक्यातील सहस्त्रमुळी येथील सोमनाथ हाके यांचे शेत कोथळी शिवारात आहे. त्यांच्या शेतात कापूस वेचणीचे काम सुरु आहे. त्यामुळे शेतात अनेक मजूर काम करीत होते. सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास सोमनाथ हाके मजुरांसाठी पिण्याचे पाणी आणण्याकरिता शेतातील विहिरीवर गेले होते. त्याचवेळी अस्वलाने त्यांच्यावर हल्ला चढविला. शेतकºयाचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूच्या शेतातील मजूर मदतीसाठी धावले. त्यामुळे अस्वलाने तेथून पळ काढला. जखमी अवस्थेत सोमनाथ हाके यांना मोताळा व त्यानंतर बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान या घटनेमुळे शेतकºयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
अस्वल लपले केळीच्या शेतात
शेतकरी सोमनाथ हाके यांच्यावर हल्ला केल्यानंतर घटनास्थळावरुन पळालेले अस्वल शेजारच्या केळीच्या शेतात लपून बसले आहे. शेतकºयांनी याबाबत वनविभागाला माहिती दिली. मोताळा आरएफओ कोंडावार आपल्या टीमसह घटनास्थळी दाखल झाले आहे. त्यानंतर त्यांनी बुलडाणा येथून रेस्क्यू टीमला बोलावून घेतले. या टीमचे सदस्य राहुल चौहान, सुधीर जगताप, संदीप मडावी, देविदास वाघ यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता अस्वल केळीच्या शेतात लपून बसलेले दिसले.
(तालुका प्रतिनिधी)