शेतकऱ्यांच्या हक्कासाठी जळगावात निघाला आसूड मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2021 06:30 PM2021-10-26T18:30:58+5:302021-10-26T18:31:25+5:30

Farmers March in Jalgaon Jamod : माळीखेल,बाजार ओळ, मानाजी चौक,चौभारा,दुर्गा चौक या मार्गाने हा आसूड मोर्चा उपविभागीय महसूल कार्यालयावर धडकला.

Farmers March in Jalgaon for farmers' rights | शेतकऱ्यांच्या हक्कासाठी जळगावात निघाला आसूड मोर्चा

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी जळगावात निघाला आसूड मोर्चा

googlenewsNext

 जळगाव जामोद :         शेतकरी व सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी आ.डॉ.संजय कुटे यांचे नेतृत्वात मंगळवारी २६ ऑक्टोबर रोजी आसूड मोर्चा काढण्यात आला. स्थानिक राठी जिनिंगमधून या मोर्चाला सुरुवात झाली आणि माळीखेल,बाजार ओळ, मानाजी चौक,चौभारा,दुर्गा चौक या मार्गाने हा आसूड मोर्चा उपविभागीय महसूल कार्यालयावर धडकला.यावेळी बुलढाणा जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा,शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी पन्नास हजाराची मदत करण्यात यावी,सन २०१९-२० मधील पीक विम्याची तफावत दूर करण्यात यावी,सन २०२१-२२ च्या हंगामातील पीक नुकसानीचा सरसकट पिक विमा देण्यात यावा,शेतकऱ्यांचे थकीत कर्ज माफ करावे,कृषी पंपांना २४ तास वीज पुरवठा करण्यात यावा, कोरोना काळातील थकीत वीज बिल माफ करण्यात यावे व निराधार नागरिकांच्या खात्यात दिवाळीपूर्वी रक्कम जमा करण्यात यावी अशा घोषणांनी जळगाव शहर दुमदुमून गेले होते.
        शेतकऱ्यांनी विविध मागण्यांचे फलक मोर्चात फडकविले होते.आ.डॉ.संजय कुटे हे आपल्या सहकाऱ्यांसह सहभागी झाले होते. उपविभागीय महसूल कार्यालयाजवळ मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. सभेनंतर एसडीओ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जळगाव नगराध्यक्ष सीमा डोबे,शेगाव नगराध्यक्ष शकुंतला बूच,जि प सदस्य राजेंद्र उमाळे, रूपाली काळपांडे,बंडू अवचार,मंजुषा तिवारी, प्रमोद खोद्र,ज्ञानदेव भारसाकळे,सभापती रामेश्वर राऊत व रत्नप्रभा धर्माळ,जिल्हा सरचिटणीस नंदकिशोर अग्रवाल,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख,राजेंद्र ठाकरे,लोकेश राठी,तालुकाध्यक्ष प्रकाश वाघ,जानराव देशमुख,ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ.रवींद्र ढोकणे,पांडुरंग हागे,जिल्हा उपाध्यक्ष गुणवंतराव कपले,भारत वाघ,पांडुरंग बूच, उपसभापती महादेव धुर्डे,अभिमन्यू भगत,ज्ञानेश्वर साखरे,शरद अग्रवाल,चंदा पुंडे,राजेंद्र गांधी, डॉ.प्रकाश बगाडे,गुणवंत खोडके,परीक्षित ठाकरे, विजय लांजुळकर,डॉ.अमोल कुकडे,लता तायडे, डॉ.अपर्णाताई कुटे,शोएब खान आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती होती.

...तर काळी दिवाळी साजरी करणार - आमदार संजय कुटे

गेल्या दोन वर्षापासून विदर्भातील शेतकरी हा दुष्काळाचा सामना करीत असताना राज्य सरकार मात्र याकडे पूर्ण दुर्लक्ष करून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडत आहे.कर्जमाफीच्या व आर्थिक मदतीच्या केवळ पोकळ घोषणा करण्याचा सपाटा राज्य सरकारने लावला असून शेतकऱ्यांना मात्र प्रत्यक्ष कोणतीही मदत मिळाली नाही.परिणामी जळगाव जामोद, संग्रामपूर व शेगाव तालुक्यातील शेतकरी अक्षरशः हवालदिल झाला आहे.दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांना आर्थिक मदत न मिळाल्यास आघाडी सरकारच्या विरोधात काळी दिवाळी साजरी करण्यात येईल असा इशारा भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार डॉ.संजय कुटे यांनी दिला.

Web Title: Farmers March in Jalgaon for farmers' rights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.