शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचे ‘ढोल बजाओ’ आंदोलन

By admin | Published: July 11, 2017 12:11 AM2017-07-11T00:11:21+5:302017-07-11T00:41:22+5:30

बुलडाणा : बँकनिहाय शेतकरी व रक्कम याची यादी जाहीर करा, अशी मागणी करीत शिवसेनेच्यावतीने जिल्हा अग्रणी बँकेसमोर ‘ढोल बजाओ’ आंदोलन करण्यात आले.

For the farmers, the movement of 'Dhol Bajo' movement of Shivsena | शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचे ‘ढोल बजाओ’ आंदोलन

शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचे ‘ढोल बजाओ’ आंदोलन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेनेने लढा उभारला. भाजपने कर्जमाफी जाहीर केली. मात्र, बँकनिहाय शेतकरी व रक्कम याची यादी जाहीर करा, अशी मागणी करीत शिवसेनेच्यावतीने जिल्हा अग्रणी बँकेसमोर ‘ढोल बजाओ’ आंदोलन करण्यात आले.
खा. प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आ.डॉ. शशिकांत खेडेकर, आ.डॉ. संजय रायमुलकर, जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत व जिल्हाप्रमुख दत्ता पाटील, युवा सेना जिल्हाप्रमुख ऋषिकेश जाधव, नगरसेवक संजय गायकवाड यांच्या नेतृत्वात ‘ढोल बजाओ’ आंदोलन करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: टिष्ट्वट् करून राज्यातील कर्जमाफी जाहीर केलेल्या शेतकऱ्यांचे जिल्हानिहाय आकडे दिले. मात्र, याबाबत संभ्रम असून, खरोखरच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत आहे की नाही, यासाठी बँकनिहाय शेतकऱ्यांची यादी व माफ झालेली कर्जाची रक्कम जाहीर करावी, तसेच कर्ज माफ झालेल्या शेतकऱ्यांची यादी बँकनिहाय लावण्यात यावी, शासनाने १० हजार रुपये तातडीच्या मदतीचा जी.आर. नुसार शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्यात यावी, या मागणीसाठी ढोल वाजवून भाजपा सरकारला यासाठी जागे करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यावेळी म्हणाले. तसेच शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यास सहन करणार नाही. दुबार पेरणीचेही संकट ओढवले आहे. साडेसात लाख हेक्टर पेरणीपैकी साडेपाच लाख पेरणी झालेले क्षेत्र पावसाच्या सुटीमुळे प्रभावित झाले आहे. दोन लाख हेक्टरवरील पेरण्या रखडल्या आहेत. त्यामुळे पदरमोड केलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ पीक कर्ज मिळावे, अशी मागणी जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत व जिल्हाप्रमुख दत्ता पाटील यांनी बोलताना केली. यावेळी महिला आघाडी जि.प्र. सिंधुताई खेडेकर, उपजिल्हा प्रमुख शांताराम दाणे, बाबूराव मोरे, तालुकाप्रमुख भोजराज पाटील, सुरेश वाळूकर, बळीराम मापारी, कपिल खेडेकर, संतोष डिवरे, अनिल अमलकार, किसान सेना उप जि.प्र.लखन गाडेकर, नगरपालिका उपाध्यक्ष विजय जायभाये, सभापती उमेश कापुरे, दीपक सोनुने, पं.स.सदस्य दिलीप सिनकर, राजू पवार, राजू मुळे, गजानन मुठ्ठे, साहेबराव डोंगरे, कृष्णा भोरे उपसभापती, गजानन मामलकर, गुलाब शिराळ, अनंता पाटील, रणजित राजपूत, विश्वंभर लांजूळकर, सुखदेव शिपलकर, समाधान साबळे, संजय तोटे, राहुल जाधव, नीलेश राठोड, अरूण टेकाळे, अनिल जगताप, विजय इतवारे, जि.प.सदस्य आशिष रहाटे, माणिकराव सावळे, धनशिराम शिंपणे, सुमंत इंगळे, गजानन टेकाळे, गजानन धंदर, श्रीकांत गायकवाड, दीपक तुपकर, अनुप श्रीवास्तव, प्रवीण निमकर्डे, वैशाली ठाकरे, किरण देशपांडे, शेषराव सावळे, मोहन निमरोट, गोपाल बारवाल, नंदू कऱ्हाडे, शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शेतकरी बांधव यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Web Title: For the farmers, the movement of 'Dhol Bajo' movement of Shivsena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.