नवीन वीज कनेक्शन मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना मिळेना 'कोटेशन'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 02:13 PM2018-12-29T14:13:27+5:302018-12-29T14:17:07+5:30
संग्रामपुर : गेल्या सहा महिन्यापासून महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीची आॅनलाइन प्रणाली ठप्प असल्याने नवीन पंप धारक शेतकºयांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसताना दिसत आहे
- अझहर अली
लोकमत न्यूज नेटवर्क
संग्रामपुर : गेल्या सहा महिन्यापासून महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीची आॅनलाइन प्रणाली ठप्प असल्याने नवीन पंप धारक शेतकºयांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसताना दिसत आहे. नवीन वीज कनेक्शन मिळवण्यासाठी शेतकºयांना महावितरण कंपनीचे उंबरठे झिजवून सुद्धा कोटेशन मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाला आहे.
शेतीपंपाला नवीन विज कनेक्शन मिळत नसल्याने शेतकºयांचे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. कर्जबाजारी होऊन शेतकºयांनी शेतामध्ये विहिरी खोदल्या व त्यावर नवीन पंप बसवले परंतु त्याचा फायदा सध्या तरी शेतकºयांना होत नाही. कनेक्शन नसल्याने मोटर पंप बंद अवस्थेत आहे. याला शासनाचे उदासीन धोरण कारणीभूत ठरत असल्याचा आरोप शेतकºयांकडून होत आहे. सध्या स्थितीत सर्वत्र दुष्काळ असल्याने शेतकरी देशोधडीला टेकला आहे.
शासन स्तरावरून शेतकºयांच्या प्रश्नावर तातडीने पावले उचलण्याऐवजी शेतकºयांना वेठीस पकडण्याचा प्रकार समोर आला आहे जून महिन्यापासून नवीन वीज पंप धारकांना कोटेशन मिळत नसल्याने त्यांना वीज कनेक्शन पासून वंचित राहावे लागत आहे. ही परिस्थिती संग्रामपूर तालुक्यासह संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यात दिसून येत आहे. शेतामध्ये नवीन वीज कनेक्शन घेण्यासाठी शेतकरी कागदपत्राची पूर्तता करून महावितरण कंपनी कार्यालयात जात आहेत. वितरण कंपनीकडून शेतकºयांचे अर्ज स्वीकारण्यात येतात परंतु अर्ज आॅनलाईन करतेवेळी आॅनलाईन प्रणालीत कोटेशनचे आॅप्शन बंद असल्याने त्यांना कोटेशन काढता येत नाही. त्यामुळे शेतकºयांचे अर्ज धूळ खात पडत आहेत संग्रामपूर तालुक्यात हा प्रकार गेल्या सहा महिन्यापासून सुरू आहे. संग्रामपूर तालुक्यात शासन स्तरावरून गंभीर स्वरूपाचे दुष्काळ जाहीर जाहीर करण्यात आला. परंतु दुष्काळावर उपाययोजना शून्य असल्याने घोषणा करून शासन मोकळे झाल्याचे दिसून येत आहे. विज जोडणी साठी १०० ते सव्वाशे अर्ज प्रलंबीत आहेत.
नविन वीज कनेक्शन साठी आॅनलाईन अर्ज भरण्यात येतात. परंतु पाच ते सहा महीण्यापासून आॅनलाईन प्रक्रियेत कोटेशनचे आॅप्शन उघडत नाही. त्यामुळे कोटेशन देणे बंद आहेत. आॅनलाईन प्रक्रीया सुरळीत होताच शेतकºयांना तातडीने कोटेशन देण्यात येतील.
- एस. बी. नवलकर
उपकार्यकारी अभियंता संग्रामपूर