शेतकरी संघटनेने केली तुरीची होळी

By admin | Published: March 15, 2017 01:13 AM2017-03-15T01:13:44+5:302017-03-15T01:13:44+5:30

जिल्हाधिका-यांना निवेदन: आधारभूत किमतीने खरेदी करण्याची मागणी

Farmer's organization has celebrated Holi | शेतकरी संघटनेने केली तुरीची होळी

शेतकरी संघटनेने केली तुरीची होळी

Next

बुलडाणा, दि. १४- यंदा तुरीचे दर आधारभूत किमतीपेक्षा खाली कोसळले आहे. परिणामी शेतकर्‍यांना त्यांचा शेतीमाल कवडीमोल भावाने विकावा लागत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची तूर आधारभूत किमतीने खरेदी करण्यात यावी, शेतकर्‍यांना तत्काळ पैसे मिळण्याची सोय करण्यात यावी तसेच तत्काळ संपूर्ण कर्जमुक्ती जाहीर करण्यात यावी. आदी मागण्यांसाठी शेतकरी संघटनेने १४ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तुरीची होळी करून शासनाचा निषेध केला.
याप्रसंगी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना एक मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या निवेदनात नमूद आहे की, तुरीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होऊनही सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकर्‍यांना तुरीची कवडीमोल भावात विक्री करावी लागत आहे. त्यातच शासनाने सुरु केलेल्या खरेदी केंद्राची संख्या अतिशय कमी आहे. बारदानाअभावी अनेक ठिकाणी खरेदी बंद आहे. चुकार्‍यांपोटी शेतकर्‍यांना देण्यात आलेले चेक महिना महिना वटत नाहीत.
त्यामुळे कास्तकाराला व्यापारी देईल त्या भावात तूर विकावी लागत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची लूट थांबावी, यासाठी संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे पुढील मागण्या केल्या आहेत. तूर उत्पादक पट्टय़ात सर्व बाजार समित्यांमध्ये तूर खरेदी केंद्र सुरु करून पुरेशे वजनकाटे लावावेत, खरेदी केंद्रावर २४ तासात तुरीचे वजन करण्याची व ४८ तासात चेक वटवून शेतकर्‍यांच्या हातात पैसे देण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशा मागण्या शेतकरी संघटनेने निवेदनात केल्या आहेत. सोबतच सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी कर्जबाजारी होत असल्याचे नमूद करून सरसकट कर्जमुक्ती करण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेने तुरीची होळी केली, यावेळी नामदेवराव जाधव, डॉ.हासनराव देशमुख, समाधान कणखर, मो.सादिक देशमुख, सुगदेव नरोटे, तेजराव मुंढे, दिनकर टेकाळे, जगदीश जैस्वाल, शेषराव शेळके, भागवत शेळके, सोनटक्के, ज्ञानेश्‍वर शेळके, भिका सोळंकी, दिगंबर अंभोरे, उत्तम झुंबड, संतोष उबरहंडे, अर्जुन जाधव, माधव शिंदे, हरिदास खान्देभराड, दामोधर शर्मा, वैजयकुमार डागा, डॉ.बाबूराव नरोटे आदींची उपस्थिती होती.

Web Title: Farmer's organization has celebrated Holi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.