चिखली-खामगाव महामार्गाच्या कडेला शेतकर्‍यांनी पुकारले बेमुदत उपोषण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 12:52 AM2018-01-29T00:52:24+5:302018-01-29T00:54:37+5:30

चिखली : खामगाव ते चिखली या राष्ट्रीय माहामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू असून, यांतर्गत दोन्ही बाजूकडील शेतकर्‍यांच्या शेतजमिनी अधिग्रहणाची कोणतीही प्रक्रिया न राबविता परस्पर ताब्यात घेऊन त्यावर रस्त्याचे बांधकाम करण्यात येत आहे. तसेच या बदल्यात शेतकर्‍यांना कोणत्याही प्रकारे मोबदला मिळत नसल्याने या अन्यायाविरोधात तालुक्यातील दहिगाव येथील शेतकर्‍यांनी २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनापासून रोडच्या कडेला बेमुदत उपोषणास सरुवात केली आहे. 

Farmers protest at the Chikhali-Khamgaon highway, incessant hunger strike! | चिखली-खामगाव महामार्गाच्या कडेला शेतकर्‍यांनी पुकारले बेमुदत उपोषण!

चिखली-खामगाव महामार्गाच्या कडेला शेतकर्‍यांनी पुकारले बेमुदत उपोषण!

googlenewsNext
ठळक मुद्देसंपादित जमिनीचा मोबदल्यासाठी दहिगाववासियांनी सुरू केले आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : खामगाव ते चिखली या राष्ट्रीय माहामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू असून, यांतर्गत दोन्ही बाजूकडील शेतकर्‍यांच्या शेतजमिनी अधिग्रहणाची कोणतीही प्रक्रिया न राबविता परस्पर ताब्यात घेऊन त्यावर रस्त्याचे बांधकाम करण्यात येत आहे. तसेच या बदल्यात शेतकर्‍यांना कोणत्याही प्रकारे मोबदला मिळत नसल्याने या अन्यायाविरोधात तालुक्यातील दहिगाव येथील शेतकर्‍यांनी २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनापासून रोडच्या कडेला बेमुदत उपोषणास सरुवात केली आहे. 
खामगाव ते चिखली या राष्ट्रीय महामार्गाचे काम काही महिन्यांपासून युद्धस्तरावर  सुरू आहे. या महामार्गाच्या रुंदीकरणांतर्गत २४ मीटर रस्ते तयार करण्यात येत असताना यामध्ये रस्त्याच्या कडेवरील शेतकर्‍यांच्या जमिनीचा ताबा कोणत्याही अधिग्रहणाशिवाय परस्पर घेतला जात आहे, तसेच नियोजित २४ मीटर रुंदीपेक्षा जास्त  रुंदीचे मोजमाप करून जमीन ताब्यात घेतली असल्याचा आरोप दहिगाव येथील शेतकर्‍यांनी केला असून, याबाबत १२ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी बुलडाणा यांना निवेदन देऊन याबाबत तातडीने न्याय न मिळाल्यास उपोषणास बसण्याचा इशारा शेतकर्‍यांनी दिला होता. तसेच रस्ता रुंदीकरणांतर्गत होणार्‍या कामामुळे व वाहनांनासाठी तयार करण्यात आलेल्या वळण रस्त्यामुळे उडणारी धूळ आजूबाजूच्या शेतातील हरभरा, गहू, वाल, यासारख्या पिकाचे नुकसान करीत आहे. सदर झालेल्या नुकसानाची मोका पाहणी करून शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणीसुद्धा शेतकर्‍यांनी केली असून, या मागणीची दखल न घेतल्याने दहिगाव येथील बळीराम नारायण खरपास, भास्कर मोतीराम खरपास, दिलीप देवलाल बेदकर यांच्यासह संतोष रसाळ, दिलीप  खरपास, विजय होगे यांनी २६ जानेवारीपासून रस्त्याच्या कडेला आमरण उपोषण चालविले आहे. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकरी संघटनेने या आंदोलनास पाठिंबा जाहीर केला असून, प्रशासनाने शेतकर्‍यांच्या उपोषणाची दाखल न घेतल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल, असा इशारा स्वाभिमानीचे नितीन राजपूत, जिल्हा उपाध्यक्ष अनिल वाकोडे, तालुकाध्यक्ष शेख मुखतर, अमोल तेलांगरे, भागवत म्हस्के रामेश्‍वर परिहार, दीपक  धनवे, राम अंभोरे यांनी दिला आहे, तर अन्यायकारकरीत्या शेतकर्‍यांच्या जमिनी बळकावून शासन शेतकर्‍यांची पिळवणूक करीत असेल, तर शेतकर्‍यांना न्याय मिळविण्यासाठी शेतकरी संघटना शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याची भूमिका प.स. सदस्य उषा उद्धव थुट्टे यांनी जाहीर केली आहे. 

Web Title: Farmers protest at the Chikhali-Khamgaon highway, incessant hunger strike!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.