सावळा येथे शेतकरी बचाव आंदोलन
By admin | Published: November 17, 2014 12:43 AM2014-11-17T00:43:17+5:302014-11-17T00:43:17+5:30
सोयाबीनला ५ हजाराचा व कापसाला ७ हजाराचा हमीभाव देण्याची मागणी.
बुलडाणा : विदर्भ शेतकरी, शेतमजूर संघटना यांच्या नेतृत्वात सावळा येथे शेतकरी बचाव आंदोलन करण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष लखन गाडेकर यांच्या नेतृत्वात या आंदोलनातून विविध मागण्या शासनापुढे मांडण्यात आल्या. या आंदोलनाची सुरुवात गावातील आनंदा पाटील तुपकर यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी सोयाबीनला ५ हजाराचा व कापसाला ७ हजाराचा हमीभाव मिळाला पाहिजे, बुलडाणा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकर्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे अशा घोषणा देऊन गावकर्यांनी परिसर दणाणून सोडला होता. यावेळी संघटनेचे अध्यक्ष लखन गाडेकर, तालुकाध्यक्ष शिवाजी बंगाळे, विष्णू राजपूत, भरत जगताप, अरुण जगताप, भानुदास जगताप, काशिनाथ टेकाळे, विलास इंगळे, जगन्नाथ जगताप, सखुबाई इंगळे, कौशल्याबाई वखरे, रुख्माबाई जगताप, सुलाबाई गायकवाड, उषाबाई रायकर, लक्ष्मीबाई वखरे, मंगलाबाई गाडेकर, सिंधुबाई जगताप, सोनू चव्हाण आदी उपस्थित होते.