ई-पीक पाहणी करून शेतकऱ्यांनी पुढील नुकसान टाळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:41 AM2021-09-17T04:41:05+5:302021-09-17T04:41:05+5:30

‘माझी शेती, माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पीकपेरा’ या घोषवाक्याच्या आधारे शासनाने १५ ऑगस्टपासून ई-पीक पाहणीचा श्रीगणेशा केला आहे. ...

Farmers should avoid further losses by inspecting e-crops | ई-पीक पाहणी करून शेतकऱ्यांनी पुढील नुकसान टाळावे

ई-पीक पाहणी करून शेतकऱ्यांनी पुढील नुकसान टाळावे

Next

‘माझी शेती, माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पीकपेरा’ या घोषवाक्याच्या आधारे शासनाने १५ ऑगस्टपासून ई-पीक पाहणीचा श्रीगणेशा केला आहे. देऊळगावराजा तालुक्यातील काही गावामध्ये ई-पीक पाहणी ॲपला शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर काही ठिकाणी महसूल प्रशासनाला ई-पीक पाहणी ॲपचा वापर कसा करावा, यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी लागत आहे. देऊळगावराजा तालुक्यात देखील तहसीलदार डॉ. सारिका भगत यांनी शेतकऱ्यांनी मुदतीच्या आत आपल्या शेतातील खरीप पिकाचा पीकपेरा ई-पीक पाहणी ॲपच्या माध्यमातून नोंदणी करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत आहे. त्यासाठी त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी ॲपचा वापर कसा करावा, याबाबत मार्गदर्शन करत आहे. दरम्यान त्यांनी १५ सप्टेंबर रोजी देऊळगाव राजा तालुक्यातील मेहूणा राजा, सिनगावा जहाँगीर व पांगरी माळी येथील शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन ई-पीक पाहणीचे महत्त्व पटवून दिले आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांना ई-पीक पाहणीची नोंदणी करताना अडचणी येत असल्यास त्याची सोडवणूक करण्याचे काम हाती घेतले आहे. आपल्या गावातील पीकपेराची संपूर्ण नोंदणीसाठी गावातील स्वयंसेवक, युवक, गाव पुढारी यांनीदेखील गावातील शेतकऱ्यांना ग्राम स्थरावर सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार डॉ. सारिका भगत यांनी केले आहे.

ई-पीक पाहणी नोंदवण्यास मुदतवाढ

ई- पीक पाहणी ॲपद्वारे नोंदवण्यास शेतकऱ्यांना एक महिन्याची मुदत देण्यात आली होती. ई-पीक पाहणी ॲपमधून नोंदणीची मुदत १५ सप्टेंबर निश्चित करण्यात आली होती. मात्र, आता सातबारा उताऱ्यावर ऑनलाइन पद्धतीने खरीप हंगामातील पिकाच्या नोंदणीला पंधरा दिवस मुदतवाढ देण्यात आली आहे. शेतकरी त्यांच्या स्तरावर ई-पीक पाहणी ३० सप्टेंबरपर्यंत करू शकतात. तर, तलाठी स्तरावरील पीक पाहणी नोंदवण्याची मुदत १५ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी उद्यापर्यंत ई-पीक पाहणी ॲपद्वारे आपल्या शेतातील पिकाची नोंदणी केली नाही त्यांनी तत्काळ नोंदणी करावी, असे आवाहन महसूल व कृषी विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

Web Title: Farmers should avoid further losses by inspecting e-crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.