पेनटाकळी प्रकल्पाच्या पाण्यात शेतकऱ्यांनी सुरू केले उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 06:41 PM2021-02-06T18:41:55+5:302021-02-06T18:43:19+5:30

Farmers Hunger Strike ११ किलोमीटरपर्यंत पाईपलाईनने पाणी नेण्यात यावे, या मागणीसाठी शेतकरी पेनटाकळी प्रकल्पात उपोषणाला बसले आहेत.

Farmers started a hunger strike in the waters of Pentakali project | पेनटाकळी प्रकल्पाच्या पाण्यात शेतकऱ्यांनी सुरू केले उपोषण

पेनटाकळी प्रकल्पाच्या पाण्यात शेतकऱ्यांनी सुरू केले उपोषण

googlenewsNext
ठळक मुद्देपाणी सोडले तर नुकसान, नाही सोडले तर पिके वाळतात.त्यामुळे प्रशासनही कोंडीत सापडले आहे.

हिवरा आश्रमः पेनटाकळी प्रकल्पाच्या कालव्यातून पाणी पाईपलाईनद्वारे देण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी सकाळपासून पेनटाकळी प्रकल्पाच्या पाण्यात शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे. दुसऱ्या दिवशीही हे उपोषण सुरूच होते. पाणी सोडले, तरीही नुकसान होते, आणि पाणी नाही सोडले तर समोरच्या शेतकऱ्यांना पिकांना पाणी मिळत नाही. त्यामुळे प्रशासनही कोंडीत सापडले आहे.

मेहकर तालुक्यात असलेल्या पेनटाकळी प्रकल्पाच्या कालव्याद्वारे हजारो हेक्‍टर सिंचन केले जाते. मात्र या कालव्याची परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याने कालवा पाझरुन लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. पाझरत असलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांची शेती खराब होत आहे. त्यामुळे ० ते ११ किलोमीटरपर्यंत पाईपलाईनने पाणी नेण्यात यावे, या मागणीसाठी शेतकरी पेनटाकळी प्रकल्पात उपोषणाला बसले आहेत. शनिवारी जिल्हा परिषद अध्यक्ष मनिषा पवार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष देवानंद पवार यांनी उपोषण कर्त्या शेतकऱ्यांना भेट दिली. या शेतकऱ्यांच्या सर्व अडचणी जाणून घेऊन जिल्हा परिषद अध्यक्ष मनिषा पवार यांनी जलसंधारण मंत्री यांना भ्रमणध्वनीद्वारे परिस्थितीची माहिती दिली. यासोबतच सर्व परिस्थितीचा अहवाल तयार करून स्वतः या प्रकरणाचा पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना सांगितले.
 

Web Title: Farmers started a hunger strike in the waters of Pentakali project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.