शेतकऱ्यांची ओला कापूस वाळविण्यासाठी धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 03:40 PM2019-11-17T15:40:18+5:302019-11-17T15:40:34+5:30

सध्या गावोगावी वेचणी झालेला कापूस वाळविण्याची धडपड शेतकरी करताना दिसून येत आहेत.

Farmers struggle to dry wet cotton | शेतकऱ्यांची ओला कापूस वाळविण्यासाठी धडपड

शेतकऱ्यांची ओला कापूस वाळविण्यासाठी धडपड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात २ लाख १३ हजार १८७ हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड आहे. यंदा सुरूवातीला पाऊस चांगला असल्याने कपाशी पीक चांगले बहरले होते. परंतू कापासाच्या पहिल्या वेचणीवरच पाणी फेरल्या गेले. अनेक शेतातील कापूस ओला झाला. काही ठिकाणी कापसाची बोंडे भिजली. सध्या गावोगावी वेचणी झालेला कापूस वाळविण्याची धडपड शेतकरी करताना दिसून येत आहेत.
जिल्ह्यातील खरीप हंगामामध्ये कापूस पिकाचे सरासरी क्षेत्र १ लाख ९९ हजार २६३ आहे. नियोजित क्षेत्रापेक्षा यंदा कपाशीच्या क्षेत्रामध्ये वाढ झाली. दिवाळीच्या सुरूवातीला कापसाची पहिली वेचणी होऊन दिवाळी आनंदात जाईल, या आशेवर शेतकरी होते. परंतू परतीच्या पावसाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आशेवरच पाणी सोडले. जिल्हाभर झालेल्या पावसाने सोयाबीन, मका, ज्वारी या पिकासोबतच कपाशीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. कापसाची पहिली वेचणी सुरू असताना कपाशी पिकाला पावसाने झोडपले. कापसाची बोंडे सडली. यंदा कापूस फुटण्यापासून सततच्या अवकाळी पावसामुळे ओला झालेला कापूस उन्हात वाळवून विकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. वेचून आणलेला कापूस घरासमोर वाळत घालण्यासाठी शेतकरी धडपड करत आहेत. अनेकांच्या घरासमोर कापूस वाळत घातलेला दिसून येतो. ओल्या कापसाचा दर्जा खालावल्याने त्याला योग्य तो भाव मिळेल की नाही, याची शाश्वती राहिली नाही. त्यामुळे पहिल्याच वेचणीत कापूस उत्पादक शेतकºयांना मोठा फटका बसला आहे.


पांढºया सोन्याला सुर्याची उब
किनगाव जट्टू: परिसरात कापसाची लागवड मोठ्या प्रमाणावर आहे. सध्या पाऊस उघडला असला तरी पावसाने भिजलेला कापूस वाळविण्याची कसरत शेतकºयांची सुरू आहे. पावसाच्या उघडीपीनंतर कापूस वेचणीची मजूरी वाढवून शेतकºयांनी कापासाची वेचणी सुरू केली. परंतू ओला कापूस दाबून पिवळा पडेल, अगोदारच कापसाचे दर कमी त्यामुळे शेतकरी ओल्या कापासाला वाळविण्याचा प्रयत्न करत आहेत.


१०७ टक्के कपाशी पेरा
जिल्ह्यात कपाशीचा पेरा १०७ टक्के म्हणजे २ लाख १३ हजार १८७ हेक्टर क्षेत्रावर पोहचला आहे. परंतू पावसाने कपाशीचे मोठे नुकसान केले आहे. कपाशीच्या बोंडालाच कोंब आले आहेत. दोन वर्षापूर्वी कपाशी पिकावर बोंडअळीने हल्ला केला होता. त्यानंतर आता पावसाचा फटका कपाशी उत्पादनाला बसला आहे.


कापूस वेचण्यासाठी मिळेना मजूर
पावसामुळे कापसाच्या शेतामध्ये पाणी साचलेले आहे. पावसाच्या उघडीपीनंतरही अनेक शेतांमध्ये सध्या पाणी असल्याने कापूस वेचणीसाठी मजूर मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे जादा मजूरी देऊन कापूस वेचावा लागत आहे. कापसाच्या शेतातील पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. पहिली वेचणी सोबतच पावसाने कपाशीचे झाडेही खराब झाली आहेत.

Web Title: Farmers struggle to dry wet cotton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.