रब्बीतील पिके वाचविण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 03:19 PM2020-02-11T15:19:48+5:302020-02-11T15:20:09+5:30
रब्बी हंगामातील पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असल्याचे दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांची सरासरीच्या ९० टक्के पेरणी झाली आहे. सध्या काही भागातील पिके सुस्थितीत असून अनेक ठिकाणी विविध रोगांनी हल्ला केला आहे. यामुळे शेतकरी महागड्या औषधांची फरवारणी करताना दिसत आहे. एकंदरीतच रब्बी हंगामातील पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असल्याचे दिसून येत आहे.
यावर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. जमिनीमध्ये भरपूर ओलावा निर्माण झाल्याने रब्बी पिकांना पोषक वातावरण होते. तरीसुद्धा अनेक ठिकाणी शेतजमिनी ओली असल्याने रब्बी हंगामातील पिकांची उशीरा पेरणी झाली. उत्पादनात घट येण्याची भिती व्यक्त होत असल्याने अनेक शेतकºयांच्या मनात लागवडीबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र थंडी मोठ्या प्रमाणात जाणवू लागल्याने सुरूवातील कमी असलेला रब्बी हंगामातील पिकांची लागवड करणाºया शेतकºयांचा आकडा वाढला. परतीच्या पावसामुळे झालेले नुकसान आता रब्बी हंगामातील पिकांच्या माध्यमातून भरून काढता येईल, अशी शेतकºयांना आशा होती. काही ठिकाणी याचे फलीतही होताना दिसत आहे. मात्र अनेक ठिकाणी ढगाळ वातावरणामुळे हरभरा, मका, रब्बी ज्वारी या पिकांवर विविध रोगांनी हल्ला आहे. हरभºयावर घाटेअळी तर मक्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यामुळे सदर पिके मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त होत आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या किटकनाशकांची फवारणी करूनदेखील परिणाम होत नसल्याने शेतकºयांमध्ये धास्ती भरली आहे. जिल्ह्यातील काही भागात वादळी वाºयासह हलक्या स्वरूपात पाऊस पडत आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका गहू व हरभरा पिकाला बसत आहे. यामुळे शेतकºयांवरील आर्थिक संकटात वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत.
पिकांवरील रोंगाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी शेतकरी महागड्या औषधांची फवारणी करीत आहेत. यामुळे उत्पादन खर्चामध्ये प्रचंड वाढ होत आहे. मात्र या औषधांचा पाहिजे त्या प्रमाणात दिसून येत नाही. यामुळे पिकांवर प्रादुर्भाव झालेल्या रोगांचा बंदोबस्त करताना शेतकºयांची चांगलीच दमछाक होत आहे. परिणामी उत्पादना घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (प्रतिनिधी)