नांद्रा परिसरात कपाशीवरील बोंडअळीने शेतकरी त्रस्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 01:06 AM2017-11-24T01:06:59+5:302017-11-24T01:09:40+5:30
नांद्रा: सध्या कपाशी पिकावर बोंडअळीचे मोठय़ा प्रमाणावर अतिक्रमण होत असून, यामुळे कपाशी पिकाचे नुकसान होत आहे. नांद्रा परिसरातील पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढतच आहे. परिणामस्वरूप आर्थिक अडचणीने हैराण असलेला शेतकरी कपाशी पिकाच्या नुकसानीने त्रस्त झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

कपाशी पिकावर शेंदर्या बोंडआळीने मोठय़ा प्रमाणात अतिक्रमण करून क पाशी पीक उद्ध्वस्त केले आहे. यामुळे शेतकर्यांच्या कपाशी उत्पादनात मोठया प्रमाणात घट झाली असून, यामुळे त्यांना या वर्षीसुद्धा आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. कृषी विभागाचा शेतकर्यांशी वाढलेला दुरावा व त्यांच्याकडून मार्गदर्शनाचा अभाव यांचाच हा परिणाम असल्याचे शेतकरी वर्गात बोलले जात आहे.
बोंडआळीचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी शेतकरी बाजारात मिळेल ती महागडी कीटकनाशके आणून फवारत आहेत; परंतु त्याचा आळीवर काहीच परिणाम होत नसल्याने शेतकर्यांच्या अडचणी कमी होण्याऐवजी वाढतच आहेत. सर्व उपाय करूनही कपाशी पीक हातचे गेल्याचे दिसत आहे.