शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 03:00 PM2019-01-21T15:00:54+5:302019-01-21T15:01:16+5:30
धानोरा महासिध्द : येथील शेतकरी वसंता नामदेव चौके (वय ५५) यांनी सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे स्वत:च्या शेतात विषारी औषध करून २१ जानेवारीरोजी आत्महत्या केली.
धानोरा महासिध्द : येथील शेतकरी वसंता नामदेव चौके (वय ५५) यांनी सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे स्वत:च्या शेतात विषारी औषध करून २१ जानेवारीरोजी आत्महत्या केली. गेल्या तीन वर्षापासून त्यांच्या शेतात काहीच पिकले नाही. त्यामुळे ते विवंचनेत होते. शिवाय त्यांच्या पत्नीला किडणीचा आजार आहे. आजारपणाला पैसा लावल्याने ते कर्जबाजारी झाले. त्यामुळे त्यांनी जीवनयात्रा संपवली. दाऊतपुर शिवारात स्वत:च्या शेता मध्ये काम करण्यासाठी जात असल्याचे त्यांनी घरी सांगितले. मात्र रात्री उशिरा पर्यंत घरी न परतल्याने घरच्या नातेवाईकांनी शोध घेतला. सकाळी त्यांचा लहान मुलगा अमोल स्वत:च्या शेतात शोधण्यासाठी गेला असता, वडील मृतावस्थेत आढळले.