विष प्राशन करून शेतक-याची आत्महत्या
By admin | Published: June 19, 2017 04:29 AM2017-06-19T04:29:50+5:302017-06-19T04:29:50+5:30
मेहकर तालुक्यातील उटी येथील एका शेतकर्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना १८ जून रोजी घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जानेफळ: मेहकर तालुक्यातील उटी येथील एका शेतकर्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना १८ जून रोजी घडली. मानसिक त्रासामुळे आत्महत्या केली असल्याच्या मृतकाच्या पत्नीच्या तक्रारीवरून तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सुलोचना राजू हरमकर रा. उटी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राजू विक्रम हरमकर (४५) यांनी उटी येथील शिवाजी लक्ष्मण आघळे यांच्याकडून ३ लाख रुपये व्याजाने घेतले असता ते व्याजासह ८ लाख रुपये परत केले. तरीसुद्धा शिवाजी आघळे यांनी राजू हरमकर यांना १८ लाख रुपयांची मागणी करून मानसिक त्रास दिला. तसेच जानेफळ येथील रंजन वडाळकर व नंदू निकस यांच्याकडूनही राजू हरमकर यांना मानसिक त्रास होत होता. या मानसिक त्रासाला कंटाळून राजू विक्रम हरमकर यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. त्यावरून जानेफळ पोलिसांनी सुलोचना राजू हरमकर यांच्या फिर्यादीवरून आरोपी शिवाजी लक्ष्मण आघळे, रंजन वडाळकर व नंदू निकस यांच्याविरुद्ध अप. क्र.११९/१७ कलम ३0६ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.