वर्दडी येथील शेतक-याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 07:59 PM2017-07-24T19:59:05+5:302017-07-24T19:59:05+5:30
धोंडीबा किसन भुतेकर (५५) या शेतक-याने कर्जापायी आत्महत्या केल्याची घटना २४ जुलै रोजी उघडकीस आली.
Next
ऑनलाइन लोकमत
वर्दडी, दि. 24 - येथील धोंडीबा किसन भुतेकर (५५) या शेतक-याने कर्जापायी आत्महत्या केल्याची घटना २४ जुलै रोजी उघडकीस आली. वर्दडी येथील धोंडीबा किसन भुतेकर या शेतक-याने कर्जापायी आत्महत्या केली. त्यांच्याकडे ग्रामसेवा सोसायटीचे ४५ हजार रुपये कर्ज होते. सततची नापिकी, कर्जाचा झालेला डोंगर यामुळे त्याने आपली जीवनयात्रा संपविली.
सदर शेतक-याने कर्जापायी आत्महत्या केल्याचे त्यांचा मुलगा प्रल्हाद भुतेकर व हरिभाऊ भुतेकर यांनी सांगितले. त्यांच्याकडे एकूण ४ एकर जमीन आहे. दरम्यान ते शनिवारपासून घरातून शेतात जातो, असे सांगून गेले होते.
परंतु घरी परत न आल्यामुळे त्यांच्या मुलांनी व नातेवाईकांनी पहायला सुरुवात केली. मात्र ते सापडले नाहीत. परंतु, गावाजवळील नाल्यातील विहिरीसारख्या खड्डयात त्यांचे प्रेत आढळून आले. यावेळी पोलिस पाटील सोळंके, बिटजमादार सरकटे, दराडे यांनी प्रेत बाहेर काढले.