मौंढाळा येथील शेतकऱ्याची कर्जाला कंटाळून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 04:02 PM2018-12-01T16:02:25+5:302018-12-01T16:03:11+5:30

धाड : सततची नापिकी व कर्जाला कंटाळून नजीकच्या मौंढाळा येथील ५३ वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ३० नोव्हेंबर रोजी घडली.

farmers suside in mondhala village of buldhana district | मौंढाळा येथील शेतकऱ्याची कर्जाला कंटाळून आत्महत्या

मौंढाळा येथील शेतकऱ्याची कर्जाला कंटाळून आत्महत्या

Next


धाड : सततची नापिकी व कर्जाला कंटाळून नजीकच्या मौंढाळा येथील ५३ वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ३० नोव्हेंबर रोजी घडली.
यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप हंगाम हातचा गेला. त्यातून पेरणी खर्चही मिळाला नाही. त्यातच डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढला. या विवंचनेतून मौंढाळा येथील जनार्दन खरात यांनी ३० नोव्हेंबर रोजी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांचे नावे अडीच एकर व पत्नीच्या नावे पाच एकर अशी एकूण साडेसात एकर शेती आहे. त्यांच्यावर फायनान्सचे १ लाख, आदिती अर्बन ५० हजार, आयसीआयसीआय २.५० लाख व महाराष्ट्र बँकेचे १ लाख असे ५ लाख रुपये कर्ज असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.



आत्महत्याग्रस्त शेतकरी प्रकरणाची चौकशी करुन कुटूंबास योग्य तो न्याय देण्यात येईल.
- सुरेश बगळे, तहसीलदार, बुलडाणा.

Web Title: farmers suside in mondhala village of buldhana district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.