रासायनिक खताचे भाव वाढल्याने शेतकरी अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:32 AM2021-04-13T04:32:29+5:302021-04-13T04:32:29+5:30
रासायनिक खताशिवाय शेतजमिनीत भरघोस पिकांचे उत्पादन होत नाही. शेतकऱ्यांना उत्पादन खर्च निघणे कठीण झाले आहे. मागील चार ते पाच ...
रासायनिक खताशिवाय शेतजमिनीत भरघोस पिकांचे उत्पादन होत नाही. शेतकऱ्यांना उत्पादन खर्च निघणे कठीण झाले आहे. मागील चार ते पाच महिन्यांत वारंवार खताच्या किमती वाढत आहेत. धान्याचे गडगडलेले दर, लाॅकडाऊन, रासायनिक खताच्या वाढलेल्या किमती, मजुरी, डिझेलचे वाढलेले, तर कधी अतिवृृृृष्टी याला सामोरे जात बळीराजा शेती करत आहे. सध्या गव्हाला प्रतिक्विंटल १७०० ते १८०० रुपये दर मिळतो. तर रासायनिक खताची एक गोणी १८०० ते १९०० रुपयांवर गेली आहे. चांगली पिके येण्यासाठी रासायनिक खताचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. दुधाला दर मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी पशुधन विकून टाकले. त्यामुळे घरी मिळणारे सेद्रिंय खत कमी झाले, पाणी असूनही वीज पुरवठा नाही. त्यामुळेच पिके जळून जात आहेत. यासाठी सरकारने खताच्या किमती कमी करणे गरजेचे आहे.