नव्या कृषी कायद्याच्या समर्थनार्थ शेतकरी संघटनेची बुलडाण्यात रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 11:20 AM2020-10-03T11:20:21+5:302020-10-03T11:20:44+5:30
Buldhana News रॅली काढण्यात येवून जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: केंद्र सरकारने केलेल्या नवीन कृषी कायद्याच्या समर्थनार्थ शेतकरी संघटनेच्यावतीने बुलडाण्यात शुक्रवारी रॅली काढण्यात येवून जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याच्या दिशेने टाकलेले हे पाऊस असून त्यानुषंगानेही या कायद्यात काही दुरुस्त्या करण्यात याव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली. सोबतच शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याच्या दिशेने केंद्र सरकारने पावले टाकल्याबाबत आनंदही व्यक्त करण्यात आला.
या रॅलीमध्ये शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष समाधान कणखर, वामनराव जाधव, देविदास कणखर नामदेवरावजाधव, एकनाथ थुट्टे, विलास मुजमुळे, विठ्ठ्ठल थुट्टे, एकनाथ पºहाड, रणजित डोसे, आत्माराम गाडे, बाबुराव व लोढे, अशोक तायडे, रमेश शिंदे, अर्जून जाधव, सुरेश सोनुने यांच्यासह संघटनेचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले होते. केंद्र शासनाने शेतकºयांना काही प्रमाणात व्यापाराचे स्वातंत्र्य दिले असले तरी आवश्यक वस्तू कायद्याच्या कक्षेतून वगळेल्या शेतमालचे दर पुन्हा ठरावीक पातळी पेक्षा जास्त वाढल्यास ती पिके पुन्हा आवश्यक वस्तू काद्याच्या कक्षेत घेण्याबाबत केलेली तरतुद ही कायद्याशी विसंगत आहे. शेतीमाल व्यापारात अशी अनिश्चितता असल्यास शेती क्षेत्रात मोठी गुंतवणूक होण्याची शक्यता नाही. तसेच शेतकºयांच्या मालाला कधीच किफायतशीर दर मिळण्याची शक्यता कमी असले अशी धारणा शेतकºयांमध्ये होत आहे. त्यानुषंगानेही यात दुरुस्ती करण्याची गरज आहे. कांद्याच्या निर्यातीवर घातलेली बंदी हे त्याचे उदाहरण असल्याचे कणखर यांनी सांगितले.