शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:22 AM2021-07-03T04:22:16+5:302021-07-03T04:22:16+5:30
विजेच्या लपंडावाने ग्रामस्थ त्रस्त साखरखेर्डा : पावसाचा थेंब अथवा वाऱ्याची झुळूक जरी आली तरी दीर्घकाळ वीजपुरवठा खंडित करण्यात येत ...
विजेच्या लपंडावाने ग्रामस्थ त्रस्त
साखरखेर्डा : पावसाचा थेंब अथवा वाऱ्याची झुळूक जरी आली तरी दीर्घकाळ वीजपुरवठा खंडित करण्यात येत असल्याने साखरखेर्डा येथील नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. अनेकवेळा तक्रारी करूनही त्याची दखल घेण्यात येत नसल्याचे चित्र आहे़
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या
अंढेरा : परिसरात नुकतीच जमिनीच्या वर आलेल्या कोवळ्या सोयाबीन व भेंडीच्या पिकावर राेहींच्या कळपाने ताव मारत पिके नष्ट केली. वन्यप्राणी असलेल्या रोहींच्या कळपाने येथील शेतकऱ्यांच्या सोयाबीन व भेंडी प्लॉटचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.
शेतीच्या वादातून दाेन गटात हाणामारी
माेताळा : तालुक्यातील दाभाडी शिवारात शेतीच्या धुऱ्याच्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना ३० जून रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. प्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
रसवंती जाळली, अज्ञात आराेपींविरुद्ध गुन्हा
किनगाव राजा : येथून जवळच असलेल्या शेलगाव राऊत फाट्यावर असलेल्या रसवंती केंद्राची अज्ञात आरोपीने जाळपोळ केली आहे. ही घटना २९ जून रोजी सकाळी पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. याप्रकरणी तक्रारीवरून स्थानिक पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
काेराडी प्रकल्पाच्या सांडव्यावरुन विसर्ग
मेहकर : एकाच रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे मेहकर तालुक्यातील कोराडी प्रकल्प पाण्याने तुडुंब भरला असून त्यामुळे सांडव्यातून असा पाण्याचा विसर्ग होत आहे़ धरण १०० टक्के भरल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे़
पाठ्यपुस्तक शिवाय शाळा सुरू
बुलडाणा : मोफत पाठ्यपुस्तक वितरण योजना यावेळी निष्क्रिय ठरली असून पहिल्या घंटेलाच मिळणारी पुस्तके ऑनलाईनची शिकवणी सुरु झाल्यानंतरही मिळाले नाही. परिणामी शिक्षक कितीही शिकवत असो विद्यार्थ्यांना मात्र काय शिकवले हे कळेनासे झाले आहे.
शेतात जाण्यावरून दाेन गटात हाणामारी
माेताळा : शेतातून जाण्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना २९ जून रोजी संध्याकाळी पाच ते साडेपाच वाजेच्या सुमारास मोहेगाव येथे घडली. प्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नुकसानग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत
चिखली : आमखेड परिसरात झालेल्या ढगसदृश्य पावसामुळे गाव तलाव फुटला हाेता़ त्यामुळे, शेतकऱ्यांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ या शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी हाेत आहे़