शेतकरी पीक कर्जाच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:33 AM2021-05-24T04:33:26+5:302021-05-24T04:33:26+5:30
कोरोना काळात शेतकऱ्यांचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे . अशा संकटाच्या काळात त्यास आर्थिक हातभार लावणे गरजेचे असताना अद्यापही बँकेने ...
कोरोना काळात शेतकऱ्यांचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे . अशा संकटाच्या काळात त्यास आर्थिक हातभार लावणे गरजेचे असताना अद्यापही बँकेने पीक कर्ज वाटपास सुरुवात केली नाही . कोरोना महामारीच्या काळामध्ये शेतकरी वर्गाला कोरोना व्यतिरिक्त अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. त्यातच केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलची दरवाढ केली त्यामुळे शेतकऱ्यांना शेती कामात व शेतीमाल विक्रीला नेण्यासाठी अधिकचे पैसे खर्च करावे लागत आहे . त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकासाठी केलेला खर्च निघणेही अवघड झालेले आहे . त्यातच केंद्र शासनाने खताच्या दरात मोठी वाढ केली आहे. दरवाढीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे़ बुलडाणा जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांनी या प्रकरणात दखल घेऊन सर्व बँक शाखेला आपल्या स्तरावरून सूचना द्याव्यात तसेच गावनिहाय शेतकऱ्यांना बँकेत बोलावून अथवा गावनिहाय कॅम्पचे आयोजन करून त्वरित पीक कर्ज वाटप संबंधीच्या प्रक्रियेस सुरुवात करावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने मनोहर तुपकर , विद्यार्थी सेनेच्या आदित्य काटे यांनी केली आहे .