नियमित कर्जफेड करणारे शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 05:53 PM2020-11-24T17:53:23+5:302020-11-24T17:53:26+5:30

शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रोत्साहनपर रक्कम जमा झाली नसल्याने शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागत आहे. 

Farmers waiting for regular loan repayments | नियमित कर्जफेड करणारे शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत

नियमित कर्जफेड करणारे शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव  : महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पीक कजार्ची नियमित परतफेड करणा?्या शेतकऱ्यांना पन्नास हजाराची प्रोस्हाहनपर अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. मात्र अद्यापही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रोत्साहनपर रक्कम जमा झाली नसल्याने शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागत आहे. 
नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना त्वरित दोन लाखांच्या आतील कर्जमाफीसह पन्नास हजारांची प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी   शासनाकडे केली आहे. एप्रिल २०२० पर्यंत हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर शासनाकडून वर्ग होणार होते. जिल्ह्यातील नियमित कर्जफेड करणारे शेतकरी या प्रोत्साहनपर अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन लाखांपर्यंत थकित कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला होता. 

 शासनाने नियमित कर्ज भरणार्या शेतकर्यांना ५० हजार रूपये देण्याचे जाहीर केले होते ही रक्कम देण्याबाबत शासनाच्या सूचना नाहीत शासनाने आदेश आल्याबरोबर शेतकर्यांनारक्कम देण्यात येइल
-उत्तम मनवर
व्यवस्थापक जिल्हा अग्रणी बॅंक बुलडाणा

Web Title: Farmers waiting for regular loan repayments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.