पाऊस लांबल्यामुळे शेतकरी चिंतातूर; पावसाची प्रतिक्षा कायमच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 06:39 PM2018-06-16T18:39:28+5:302018-06-16T18:40:07+5:30
खामगाव : मृग नक्षत्राच्या सुरूवातीलाच आगमन करून सर्वांनाच सु:खद धक्का देणाºया पावसाने गेल्या आठ दिवसांपासून चांगलीच दांडी मारली. यावर्षी वर्तविण्यात आलेल्या अंदाजांना काहिशी बगल देत पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.
- देवेंद्र ठाकरे
खामगाव : मृग नक्षत्राच्या सुरूवातीलाच आगमन करून सर्वांनाच सु:खद धक्का देणाºया पावसाने गेल्या आठ दिवसांपासून चांगलीच दांडी मारली. यावर्षी वर्तविण्यात आलेल्या अंदाजांना काहिशी बगल देत पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. एकीकडे मशीगतीची सर्व कामे पुर्ण झाली असली, तरी पेरणीयोग्य पावसाची अद्याप प्रतिक्षा कायमच आहे.
२५ मे रोजी रोहिणी नक्षत्र लागल्यानंतर महाराष्ट्रात पावसाला सुरूवात झाली. अनेकठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडला. मृग नक्षत्राची सुरूवात होईपर्यंत बुलडाणा जिल्ह्यातही पावसाचे आगमन झाले. यावर्षी समाधानकारक पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्यासह अनेकांनी वर्तविला असल्याने व मृग नक्षत्राच्या सुरूवातीलाच पावसाचे आगमन झाल्याने शेतकºयांच्याही आशा पल्लवीत झाल्या होत्या. अनेक वर्षांनतर यावर्षी मृग नक्षत्रातच पेरणी होण्याची दाट शक्यता यामुळे निर्माण झाली होती. शेतकºयांनीही मशागतीची कामे वेगाने केली. उसनवारी किंवा जसे जमेल तसे खते, बियाण्यांचे नियोजनही केले. शेतकरी पेरणीच्या तयारीत असतांनाच अचानक पावसाने दडी मारली. यानंतर आज येईल, उद्या येईल असे करता-करता तब्बल आठ ते दहा दिवस उलटले. तुर्तास आभाळाकडे नजरा लावून बसण्यापलिकडे शेतकºयांच्या हाती सध्यातरी काही उरले नाही.
बियाणे, खतांच्या खरेदीतून फटका
मृग नक्षत्राच्या सुरूवातीलाच पावसाचे आगमन झाल्याने शेतकºयांच्या आशा पल्लवीत झाल्या. यावर्षी लवकर पेरणी करायची या आशेने अनेक शेतकºयांनी बियाणे, खताची खरेदी केली. सगळीकडे पावसाचे वातावरण असल्याने बियाणे विक्रीच्या दुकानांवर शेतकºयांनी गर्दी केली. खरेदीत आलेली तेजी पाहता विक्रेत्यांनीही थोड्या फार फरकाने जादा दर आकारत पैसा वसूल करण्याचा प्रयत्न केला. पावसाचे वातावरण पाहून शेतकºयांनाही घासघिस न करता, बियाणे व खत खरेदी केली. यातून कमी-अधिक प्रमाणात अनेक शेतकºयांना जादा पैसे मोजावे लागले.
पुर्णेच्या पुरानेही बळावल्या होत्या आशा
मध्यंतरी पुर्णा नदीला पूर आला होता. आपल्याकडे पाऊस पडला नसतांनाही मध्यरात्री आलेल्या या पूराबद्दल पहाटे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. पुर्णेला आलेला पूर हा अकोला जिल्हा तसेच इतर ठिकाणी पडलेल्या पावसामुळे आला, हे नंतर सगळ्यांना कळले. परंतु अकोला जिल्ह्यात चांगला पाऊस झाला याचा अर्थ आपल्याकडेही एकदोन दिवसात दमदार पाऊस होईल अशी आशा साºयांनाच लागली होती. अर्थात या आशेवरही तुर्तास पाणि फेरल्या गेले आहे.