गुटखा विक्रीविरुद्धची कारवाई ठरतेय फार्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:23 AM2021-01-01T04:23:44+5:302021-01-01T04:23:44+5:30
आरोग्यास हानिकारक ठरणाऱ्या आणि कर्करोगास आमंत्रण देणाऱ्या गुटखा विक्रीवर महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेली असताना या बंदीचा गैरफायदा घेत गुटखा ...
आरोग्यास हानिकारक ठरणाऱ्या आणि कर्करोगास आमंत्रण देणाऱ्या गुटखा विक्रीवर महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेली असताना या बंदीचा गैरफायदा घेत गुटखा माफियांनी दुप्पट ते तिप्पट दराने गुटख्याची विक्री सुरू केलेली आहे. पानटपऱ्या ते किराणा दुकाने व रेस्टॉरंट इत्यादी ठिकाणी खुलेआम गुटख्याच्या पुड्या लटकवून विक्री केल्या जात आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच जानेफळनजिक निंबा फाट्यावर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने एका मोटरसायकलवरून पोत्यात गुटख्याची पाकिटे भरून विक्रीसाठी घेऊन जात असताना दोघांविरुद्ध कारवाई केली होती. या कारवाईमध्ये ८५ हजार रुपयाचा माल जप्त केला होता; परंतु त्याच्या दुसऱ्याच दिवशी पुन्हा मोटरसायकलवरून गुटखा पाकिटे पोहोचविण्याचे काम पूर्ववत सुरू झाले होते. मुलांपासून तर वृद्धांपर्यंत अनेक जण गुटख्याच्या आहारी गेल्याने कर्करोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यात गुटखाबंदीचा निर्णय घेतलेला आहे; परंतु गुटखाबंदीचा निर्णय हा केवळ कागदावरच उरलेला असून, या निर्णयानंतर मात्र गुटखा विक्रीत कमालीची वाढ झालेली आहे.