कव्वालीच्या कार्यक्रमात रसिक मंत्रमुग्ध

By admin | Published: November 13, 2014 11:37 PM2014-11-13T23:37:04+5:302014-11-13T23:37:04+5:30

मेहकर येथील पीर पहाडीबाबा उर्स, पुण्यातील कव्वालांनी सादर केली कला.

Fascinating spell-guards in Qawwali's program | कव्वालीच्या कार्यक्रमात रसिक मंत्रमुग्ध

कव्वालीच्या कार्यक्रमात रसिक मंत्रमुग्ध

Next

मेहकर (बुलडाणा): हजरत पीर पहाडी दर्गाह कंचनी महाल याठिकाणी पीर पहाडीबाबा याच्या उर्समध्ये कव्वालीचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला हो ता. दरम्यान या कव्वालीच्या कार्यक्रमात श्रोते मंत्रमुग्ध झाले होते.
हजरत पीर पहाडी बाबा यांच्या यात्रेमध्ये जळगाव खांदेश येथील कव्वाल अल तीफ हैरा व पुणे येथील कव्वाल शमीम बानो यांच्यामध्ये १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजतापासून कव्वालीला सुरुवात झाली. दरम्यान शहरासह तालु क्यातूनही अनेक श्रोत्यांनी या कव्वालीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. रात्री दहा वाजतापर्यंंत कव्वालीची मेजवाणी रसिकांना मिळाली. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हाध्यक्ष श्यामभाऊ उमाळकर, अँड.अनंतराव वानखेडे, आशाताई झोरे, लक्ष्मीबाई सौभागे, आफताब खान, हबीब बागवान, अहेमद काझी, जुबेर मेमन यांची उपस्थिती होती.

Web Title: Fascinating spell-guards in Qawwali's program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.