वन कामगार कृती समितीचे बुलडाण्यात उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 12:13 AM2017-12-08T00:13:49+5:302017-12-08T00:17:31+5:30
बुलडाणा : आपल्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी वन कामगार संघटनेच्यावतीने सामाजिक वनीकरण कार्यालयासमोर ७ डिसेंबर रोजी धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, मागण्या मान्य न झाल्यास उपोषणाचाही इशारा त्यांनी दिलेला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : आपल्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी वन कामगार संघटनेच्यावतीने सामाजिक वनीकरण कार्यालयासमोर ७ डिसेंबर रोजी धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, मागण्या मान्य न झाल्यास उपोषणाचाही इशारा त्यांनी दिलेला आहे. वरिष्ठ कामगारांना नियमित कामे दिली जावीत, रोहयो अंतर्गतही बारमाही कामे उपलब्ध केली जावी, नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत काम करणार्या कामगारांचा २-३ महिन्यांपासून पगार मिळाला नाही, त्यांचा पगार त्वरित देण्यात यावा, कामगारांची सुधारित सेवाज्येष्ठता यादी कृती समितीला देण्यात यावी आदी मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले. या प्रश्नी कृती समितीने कामगारांच्या मागण्यांबाबत बरेच लेखी पत्र दिले आणि चर्चा केली; परंतु त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे वन कामगारांनी ७ डिसेंबर रोजी धरणे आंदोलन केले. सोबतच आता ते उपोषणही करणार आहेत. कृती समितीचे राज्य संघटक मधुकर अंभोरे व सुखदेव शिंदे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. यावेळी कामगार मनोहर पिंगळे, परमेश्वर कदम, दिलीप वेलकर, विश्वनाथ आसाबे, श्रीकिसन सवळतकर, रामचंद्र कठोरे, लक्ष्मण अंभोरे, विजय जाधव, गणेश वाघ, साहेबराव डुकरे, जीवन वानखडे व कामगार उपस्थित होते.