पालखी मार्गाच्या कामाच्या चौकशीसाठी उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:41 AM2021-09-04T04:41:36+5:302021-09-04T04:41:36+5:30
विजय पवार हे स्व. दिलीपराव रहाटे चौक येथे १ सप्टेंबर रोजी उपोषणास बसले. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळचे मुख्य ...
विजय पवार हे स्व. दिलीपराव रहाटे चौक येथे १ सप्टेंबर रोजी उपोषणास बसले. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळचे मुख्य अधिकारी उदय बरडे व शिंदे यांनी या उपोषणकर्त्याला भेट देऊन माहिती दिली. संबंधित विभागाला दुभाजक, नाल्या व इतर सुविधांकरिता मागील वर्षी ३५ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले आहे. अजून मंजूर झालेले नाही. अतिक्रमण काढून जोपर्यंत रस्ता मोकळा होत नाही, तोपर्यंत आम्ही काही करू शकत नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी यावेळी दिली. जिल्हाधिकारी, नगरपालिका उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना अतिक्रमण काढण्यासाठी पत्र दिलेले आहे. परंतु कोणतीही कारवाई संबंधित विभाग करीत नसल्याचे दिसून येते. चौकशी होईपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याची भूमिका पवार यांनी घेतली आहे.
उपोषणाला अनेकांचा पाठिंबा
या उपोषणाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्याम उमाळकर, मेहकर काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष देवानंद पवार, गिरधर पाटील, जीतू अडेलकर, आपचे भानुदास पवार, प्रदीपकुमार केसरीमल संचेती यांच्यासह दोन दिवसात ६५० जणांनी उपोषण मंडपला भेट देऊन आपला पाठिंबा दर्शविला आहे.