मुलीची हत्या झाल्याचा वडिलांचा आरोप, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 11:44 AM2021-07-05T11:44:45+5:302021-07-05T11:44:54+5:30

Father accused of killing daughter : मृतक महिलेचे पती, सासू, सासरा, दीर, नणंद अशा पाच जणांविरुध्द शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

Father accused of killing daughter, charges filed against five | मुलीची हत्या झाल्याचा वडिलांचा आरोप, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

मुलीची हत्या झाल्याचा वडिलांचा आरोप, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : कुलरचा शाॅक लागून नवविवाहितेच्या मृत्यू प्रकरणाला वडिलांच्या तक्रारीनंतर कलाटणी मिळाली आहे. मृतकाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून मृतक महिलेचे पती, सासू, सासरा, दीर, नणंद अशा पाच जणांविरुध्द शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
शहरातील घिर्णी रोडवरील राणा प्रताप नगरात दुर्गा महेश चांडक (वय ३०) या विवाहित महिलेचा घरकाम करीत असताना कुलरमधून विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना ३० जून रोजी घडली. प्रारंभी या घटनेत शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. घटनेतील मृतक महिलेचा सहा महिन्यांपूर्वीच विवाह झाला असल्याने तिच्या मृत्यूप्रकरणी अनेक शंका-कुशंका व्यक्त होऊ लागल्या होत्या. मृतक महिलेचे वडील राजेश श्रीकिशन राठी रा. कन्हान पाठशिवणी नागपूर यांनी ३ जुलै रोजी मुलीच्या मृत्यूप्रकरणी पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली. ३० जून रोजी घडलेल्या घटनेत त्यांना दुपारी १२ वाजता त्यांची मुलगी गंभीर अवस्थेत आय.सी.यू.मध्ये भरती असल्याचे दूरध्वनीवरून कळविण्यात आले होते. परंतु माझ्या मुलीच्या शरीरावर जखमा असल्याने तिचा छळ झाला असल्याचा आरोप राजेश राठी यांनी फिर्यादमध्ये नमूद केला आहे. त्याबरोबरच अनेक इतर बाबीसुद्धा त्यांनी नमूद केल्या आहेत. त्यावरून शहर पोलिसांनी विवाहितेचा पती महेश सुरेशचंद्र चांडकसह, जयश्री स्मित मोहता, सुरेशचंद्र चांडक, आकाश सुरेशचंद्र चांडक, सुनीता सुरेशचंद्र चांडक अशा पाच जणांविरुद्ध कलम ४९८ अ, ३०६, ३५ अन्वये भा.द.वि.चा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्मिता म्हसाये करीत आहेत.
 

Web Title: Father accused of killing daughter, charges filed against five

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.