मुलीच्या लग्नाच्या एक दिवस आधी वडिलांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2021 18:48 IST2021-11-17T18:44:51+5:302021-11-17T18:48:41+5:30
The father died a day before the girl's wedding : मुलीच्या लग्नाच्या एक दिवस आधी किडनीच्या आजाराने वडिलांचा मृत्यू झाला.

मुलीच्या लग्नाच्या एक दिवस आधी वडिलांचा मृत्यू
पळशी बु : लग्नात मुलीच्या डोक्यावर अक्षता टाकण्याच्या पहिलेच एक दिवस आधी वडिलांनी जगाचा निरोप घेतला. त्यामुळे संभापूर परिसरात शोककळा पसरली आहे. मुलीच्या लग्नाच्या एक दिवस आधी किडनीच्या आजाराने वडिलांचा मृत्यू झाला. खामगाव तालुक्यात येत असलेल्या संभापुर येथील सर्व सामान्य कुटुंबातील ४५ वर्षीय गणेश गोटीराम तायडे यांना मागील तीन वर्षांपासून किडनीचा आजार जडला होता. त्यांचेवर अकोला येथील रुग्णालयाचे उपचार सुरू होते. अशातच मागील आठवड्यात त्यांची मुलगी पूनम गणेश तायडे हिचा विवाह गुरुवार १८ नोव्हेंबर रोजी ठरला. लग्नाची तयारी सुरू असता १७ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान मुलीचे लग्न लागण्या अगोदर एक दिवस पहिले वधुपिता गणेश गोटीराम तायडे यांचा किडनीच्या आजाराने मृत्यू झाला. त्यांच्या पच्छात पत्नी ,१ मुलगा,२ मुली, असा बराच मोठा आप्त परिवार आहे.