सासऱ्याने केली नातू व सुनेची हत्या, बुलढाण्यात धक्कादायक प्रकार उघड
By विवेक चांदुरकर | Updated: January 23, 2024 17:50 IST2024-01-23T17:49:11+5:302024-01-23T17:50:34+5:30
सासरा अटकेत.

सासऱ्याने केली नातू व सुनेची हत्या, बुलढाण्यात धक्कादायक प्रकार उघड
विवेक चांदूरकर,बुलढाणा : शहरात सासय्राने सून व नातवावर कुऱ्हाडीने वार करून दोघांचा निर्घृण खून केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली.
संग्रामपूर शहरातील नारायण भिकाजी गायकी या ६५ वर्षीय इसमाने २५ वर्षीय सून अश्विनी गणेश गायकी, नातू समर्थ देवानंद गायकी या दोघांवर कुऱ्हाडीने वार केले. यामध्ये १० वर्षीय समर्थ देवानंद गायकी या बालकाचा जाग्यावरच मृत्यू झाला.
गंभीर जखमी असलेली अश्विनी गणेश गायकी या महिलेला तातडीने उपचारासाठी शेगाव येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र वाटेतच महिलेचा मृत्यू झाला. महिला ८ महिण्याची गरोदर असल्याची माहिती आहे. या हृदयद्रावक घटनेने समाज मन सुन्न झाले आहे. दरम्यान घटनेची माहिती प्राप्त होताच तामगाव पोलीसांनी घटनास`थळी धाव घेतली. आरोपी नारायण भिकाजी गायकी याला ताब्यात घेण्यात आले आहे. तामगाव पोलीसांकडून पूढील तपास सूरू आहे. हत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.