मुलांना मारणार्या पित्यास कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 12:36 AM2017-08-15T00:36:36+5:302017-08-15T00:36:41+5:30
मलकापूर: पत्नीशी उद्भवलेल्या वादातून पतीने ४ वर्षीय मुलगी व अडीच वर्षीय चिमुकल्यास गळा दाबून जखमी करीत पोबारा केल्याची घटना १२ ऑगस्ट रोजी शहरातील बारादरी परिसरात उघडकीस आली. याप्रकरणी दाखल फिर्यादीवरून पोलिसांनी त्या निर्दयी पित्यास सावदा फैजपूर येथून अटक करीत ५ दिवसांची पोलीस कोठडी मिळवली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर: पत्नीशी उद्भवलेल्या वादातून पतीने ४ वर्षीय मुलगी व अडीच वर्षीय चिमुकल्यास गळा दाबून जखमी करीत पोबारा केल्याची घटना १२ ऑगस्ट रोजी शहरातील बारादरी परिसरात उघडकीस आली. याप्रकरणी दाखल फिर्यादीवरून पोलिसांनी त्या निर्दयी पित्यास सावदा फैजपूर येथून अटक करीत ५ दिवसांची पोलीस कोठडी मिळवली आहे.
वाघुळ येथील संगीता विष्णू गवळी (वय २५ वर्ष) ही विवाहिता ४ वर्षीय मुलगी रोशनी व अडीच वर्षीय मुलगा पीयूषसह शहरातील बारादारी या भागातील कपिल सनिसे या भावाकडे माहेरी आली होती. दरम्यान, ११ ऑगस्ट रोजी मध्यरात्री संगीता व तिचा पती विष्णू नारायण गवळी यांच्यात भांडण झाले. या भांडणात विष्णूने मुलगी रोशनीचा गळा दाबून तिला घरातील पलंगाखाली फेकले, तर मुलगा पीयूष यास घरापासून अंतरावरील सुरेश ढोले यांच्या बांधकाम असलेल्या खड्डय़ामध्ये जखमी करून फेकून दिले व पोबारा केला. १२ ऑगस्ट रोजी सकाळी पीयूषसह रोशनीला उपजिल्हा रुग्णालयातून बुलडाणा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. उपचारादरम्यान बुलडाणा पो.स्टे.च्या पोउनि मनीषा हिवराळे यांनी संगीता गवळी यांचा जवाब घेत सदर कागदपत्रे मलकापूर शहर पो.स्टे.ला पाठवून दिले. याप्रकरणी संगीता यांचा जवाब घेत सदर कागदपत्रे मलकापूर शहर पो.स्टे.ला पाठवून दिले. याप्रकरणी संगीता गवळी यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी पिता विष्णू गवळीविरुद्ध कलम ३0७ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करीत त्यास १३ ऑगस्ट रोजी सावदा फैजपूर (जळगाव खा.) येथील रेल्वेस्थानवरून स्थानिक पोलिसांच्या मदतीने अटक केली व न्यायालयासमोर हजर करीत न्यायालयाकडून १८ ऑगस्टपर्यंत ५ दिवसांची पोलीस कोठडी मिळवली आहे. जखमी रोशनीवर बुलढाण्यातील डॉ. निकाळजे यांच्याकडे उपचार तर पीयूषवर औरंगाबाद येथील संजीवनी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.