जन्मदात्या बापाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2019 12:17 PM2019-12-04T12:17:02+5:302019-12-04T12:17:12+5:30

झोपेची गोळी देऊन नराधमाने मुलीचे सातत्याने लैंगिक शोषण केले. पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.

Father rape his minor girl in Buldhana | जन्मदात्या बापाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

जन्मदात्या बापाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अंढेरा : जन्मदात्या बापानेच आपल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा पोलिस स्टेशनअंतर्गत असलेल्या एका गावात मंगळवारी उघडकीस आली. झोपेची गोळी देऊन नराधमाने मुलीचे सातत्याने लैंगिक शोषण केले. पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.
मुलगी आणि वडिलांच्या नात्याला जगात तोड नाही. मात्र बाप-लेकीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना मंगळवारी उघडकीस आली. अंढेरा पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या एका गावातील मुलगी सहा वर्षाची असताना तिच्या आईचे निधन झाले. त्यामुळे ती मुलगी आपल्या वडीलांकडे राहत होती. काही दिवसांनी त्या व्यक्तीने दुसरा विवाह केला. मात्र दुसऱ्या पत्नीसोबत त्याचे फारशे जमत नसल्याने पत्नी त्याला सोडून माहेरी गेली. अल्पवयीन मुलगी, वडीलांसह तिच्या आजीजवळ राहून शिक्षण घेत होती. दरम्यान, २ डिसेंबर रोजी अल्पवयीन मुलगी चिखली येथे रडत बसलेली होती. काही सामाजिक कार्यकर्त्यांना रडत बसलेली मुलगी दिसली. त्यांनी तिला थेट पोलीस स्टेशनला नेले. मुलीने पोलिसांना सांगितले की, दोन महिन्यांपासून वडील जबरदस्तीने वारंवार बलात्कार करीत आहेत. त्रास होत असल्याने आत्याला वडिलांची हकीकत सांगण्यासाठी गेली तर आत्याने मारहाण केली. पोलिसांनी मुलीला रात्रभर पोलीस स्टेशनला ठेवले. दरम्यान, ३ डिसेंबर रोजी अंढेरा पोलीसांच्या स्वाधीन केले. अंढेरा पोलिसांनी मुलीच्या नातेवाईकांसह गुपित चौकशी केली. ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांनी आरोपी वडिलावर कलम ३७६, पोस्को बाल लैंगिक अत्याचार अपराध कलमानुसार गुन्हा दाखल करुन आरोपीस अटक केली आहे.

 

Web Title: Father rape his minor girl in Buldhana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.