सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा येथे पितापुत्राची आत्महत्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 01:08 AM2018-02-27T01:08:07+5:302018-02-27T01:08:07+5:30

सिंदखेडराजा : सिंदखेडराजा तालुक्यातील शिंदी येथील रहिवासी व  गेल्या काही दिवसांपासून सिंदखेड राजा येथील पोलीस स्टेशन गल्लीत  भाड्याच्या घरात राहणार्‍या पितापुत्राने गळफास घेऊन आत्महत्या  केल्याची घटना २६ फेब्रुवारी रोजी दुपारी उघडकीस आली. दरम्यान,  या बंगाळे कुटुंबातील चौघांनी वर्षभरात गळफास घेऊन आत्महत्या  केल्याने या प्रकरणाचे गूढ वाढले आ

Father & son suicide in sakharkherda, Sindhkhedraja taluka! | सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा येथे पितापुत्राची आत्महत्या!

सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा येथे पितापुत्राची आत्महत्या!

Next
ठळक मुद्देवर्षभरात कुटुंबातील चौघांनीही संपवले जीवन कौटुंबिक अस्वस्थतेतून घटना घडल्याचा कयास

लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदखेडराजा : सिंदखेडराजा तालुक्यातील शिंदी येथील रहिवासी व  गेल्या काही दिवसांपासून सिंदखेड राजा येथील पोलीस स्टेशन गल्लीत  भाड्याच्या घरात राहणार्‍या पितापुत्राने गळफास घेऊन आत्महत्या  केल्याची घटना २६ फेब्रुवारी रोजी दुपारी उघडकीस आली. दरम्यान,  या बंगाळे कुटुंबातील चौघांनी वर्षभरात गळफास घेऊन आत्महत्या  केल्याने या प्रकरणाचे गूढ वाढले आहे.
दुसरीकडे या प्रकरणात पोलिसांनी प्राथमिक स्तरावर आकस्मिक मृ त्यूची नोंद केली असून, मृत पिता-पुत्राचे पार्थिव मेहकर येथे  शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. शवविच्छेदन अहवालानंतर  या प्रकरणातील गूढ उकलले जाण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त  केली आहे. दरम्यान, पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत कौटुंबिक स् तरावरील अस्वस्थेतून या आत्महत्या झाल्याचे सकृतदर्शनी समोर येत  आहे.
 संतोष नारायण बंगाळे (वय ६५) आणि त्यांचा मुलगा लक्ष्मण संतोष  बंगाळे असे आत्महत्या करणार्‍या दोघांची नावे आहेत. लक्ष्मणचा  नवव्या वर्गात हिवरा आश्रम येथे शिकणारा मुलगा चैतन्य यानेही गेल्या  वर्षी राखीपौर्णिमेदरम्यान शिंदी येथे घरातच गळफास घेऊन आत्महत्या  केली होती तर लक्ष्मणची १७ वर्षांची मुलगी सोनाली हिनेही गळफास  घेऊनच दिवाळी दरम्यान आत्महत्या केली होती. त्यावेळी  चैतन्य हा  गावी आला होता तर लक्ष्मण हा दिंडीमध्ये शेगाव येथे गेला होता. त्या  रात्री लक्ष्मणने चैतन्यला फोन लावला होता. त्यानंतर त्याच रात्री चै तन्यने आत्महत्या केल्याचे समोर आले होते. कुटुंबातील चौघांनी  वर्षभरात गळफास घेऊनच आत्महत्या केल्याने या प्रकरणाबाबत सध्या  साखरखेर्डा परिसरात  उलटसुलट चर्चा होत आहे. कौटुंबिक स् तरावरील अस्वस्थतेतून या आत्महत्या झाल्या असाव्यात, असा कयास  पोलिसांचा असला तरी जो पर्यंत या प्रकरणात शवविच्छेदन अहवाल ये त नाही आणि मृतांचे कुटुंबीय याबाबत काही जबाब देत नाही तोपर्यंत या  पिता-पुत्रांच्या आत्महत्येची कारणे स्पष्ट होऊ शकत नाही, असे  साखरखेर्डा पोलिसांचे म्हणणे आहे.

लक्ष्मण भाड्याच्या घरात राहत होता!
लक्ष्मणच्या मुला-मुलींनी आत्महत्या केल्याने लक्ष्मण पत्नीसह  साखरखेर्डा येथील वार्ड क्रमांक पाचमध्ये (पोलीस गल्लीत)  भाड्याच्या घरात काही महिन्यांपूर्वी राहण्यास आला होता. त्यातच त्याचे  पत्नीशी खटके उडत असल्याने दोन दिवसांपूर्वीच त्याची पत्नी माहेरी  निघून गेली होती. पती-पत्नीचा वाद पोलीस स्टेशनपर्यंतही पोहोचला हो ता. मृत लक्ष्मणच्या पत्नीने पोलिसांत यापूर्वी दोनदा तक्रार केली होती. ते  प्रकरण पोलिसांनी चौकशीवर ठेवले होते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

एक दिवसापूर्वीच आले होते वडील
लक्ष्मण साखरखेर्डा येथे रहावयास आल्यानंतर पती-पत्नीत वाद  झाल्याने पत्नी माहेरी निघून गेली होती. दरम्यान, लक्ष्मणचे वडील संतोष  नारायण बंगाळे हे एक दिवसापूर्वीच साखरखेर्डा येथे आले होते; मात्र  २५ फेब्रुवारीला मध्यरात्री या पिता-पुत्रांनी गळफास घेऊन आत्महत्या  केल्याची बाब २६ फेब्रुवारीला दुपारी बारा वाजेच्या सुमारास उघडकीस  आली. दरम्यान, या प्रकरणची गंभीरता पाहता साखरखेर्डा पोलिसांनी  घटनास्थळाचे चित्रीकरण करीत पंचनामा केला असून, दोन्ही पार्थिव  मेहकर येथे शवविच्छेदनासाठी पाठविले आहेत. दरम्यान, या  कुटुंबाकडे परिसरात नऊ एकर शेती असल्याचीही माहिती आता समोर  येत आहे.

लक्ष्मण तापट स्वभावाचा
कौटुंबिक स्तरावरील अस्वस्थतेून ही घटना घडली असावी. मृतांच्या  कुटुंबातील चैतन्य व सोनाली या दोन अपत्यांनीही गेल्या काही काळात  आत्महत्या केली होती. संतोष बंगाळे आणि  लक्ष्मण बंगाळे यांनी आ त्महत्या केलेल्या खोलीचे दार आतून बंद होते. त्यामुळे त्रयस्ताकडून  घटना घडविण्यात आल्याची शक्यताही  नाही. शवविच्छेदन अहवाल  आणि नातेवाइकांच्या जबाबानंतरच या घटनेमागील  कारणे स्पष्ट होऊ  शकतात. प्रारंभी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  लक्ष्मण हा तापट स्वभावाचा होता. मद्य प्राशनाव्यतिरिक्त त्यास दुसरे  व्यसन नसल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले असल्याचे  साखरखेर्डा पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक सचिन शिंदे  यांनी सांगितले.
 

Web Title: Father & son suicide in sakharkherda, Sindhkhedraja taluka!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.