बापाची आजारी पोराच्या जीवनासाठी धडपड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 12:56 AM2017-07-21T00:56:14+5:302017-07-21T00:56:14+5:30

सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या मुलाच्या दोन्ही किडण्या निकामी

Father's struggle for the life of his dad! | बापाची आजारी पोराच्या जीवनासाठी धडपड!

बापाची आजारी पोराच्या जीवनासाठी धडपड!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : दोन्ही किडण्या निकामी झालेल्या मुलाच्या उपचाराकरिता वृद्ध शेतकऱ्याची धडपड सुरू आहे. घर, शेत विकूनही उपचारासाठी अधिक पैशांची गरज असल्यामुळे मेहकर तालुक्यातील शेतकरी भीमराव अंभोरे हतबल झाले आहेत.
मेहकर तालुक्यात शेती करणारे भीमराव अंभोरे यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. मुलगी गतिमंद आहे. त्यांनी चांगले शिक्षण देत मोठा मुलगा सुदर्शन याला सॉफ्टवेअर इंजिनियर केले. सुदर्शनने शिकवणी घेण्याला सुरुवात केली. सुमारे शंभर विद्यार्थी सुदर्शनकडून संगणकाचे ज्ञान घेत होते. आई -वडिलांनी आपल्यासाठी अपार कष्ट घेतले आहे. आता त्यांच्या हितासाठी झटण्याचा त्याने निश्चय केला. हे सुखी कुटुंब आनंदाने जीवन जगत होते; मात्र काळाला हे मान्य नव्हते. एक दिवस अचानक सुदर्शन रस्त्यावर कोसळला. त्याच्या मित्रांनी त्याला रुग्णालयात दाखविले असता, त्याच्या दोन्ही किडणी निकामी झाल्याची माहिती सुदर्शनच्या आई - वडिलांना कळली. सुदर्शनच्या वडिलांनी त्यांचे अर्धे घर विकले. आपल्या चार एकर शेतीतून पावणेदोन एकर शेतीही विकली; पण दिवसेंदिवस त्याची प्रकृती बिघडत चालली होती. आई, वडील, भाऊ, बहीण प्रत्येकांना आपली तरी किडणी सुदर्शनला वाचवू शकेल, या उद्देशाने सर्व चाचण्या केल्या; मात्र सर्वांच्याच किडणी जुळत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शेवटी ते हतबल झाले होते. तेव्हा माध्यमांच्याद्वारे अनेक दानशुरांनी पुढे येऊन आपला मदतीचा हात त्यांच्या पुढे केला. पुण्याच्या एका खासगी रुग्णालयात २०१५ मध्ये एक ब्रेन डेड व्यक्तीच्या किडनीचे प्रत्यारोपण सुदर्शनवर करण्यात आले. सुदर्शनवर शस्त्रक्रिया झाली; मात्र काही महिन्यातच त्याच्या नाकातून आणि लघवीतून रक्त वाहू लागले. डॉक्टरांनी त्याला मुंबईला हलविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार परळच्या केईएम रुग्णालयात त्याचा दीर्घकाळ उपचार सुरू होता. जीवनदायी योजनेंतर्गत मिळणारी आर्थिक मदत संपल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यावर आसपासच्या काही संस्थांनी भीमराव यांना काही मदत केली. आपल्या मुलाला होत असलेल्या यातना बघून भीमराव यांचे मन खचून गेले आहे. आता पुन्हा शस्त्रक्रिया होणार एवढी ऐपत नसल्याने सुदर्शन आहे तोपर्यंत डायलेसीसवर त्याला जगण्यासाठी दररोज नव्या उमेदिने मजुरी करणारे भीमराव आपल्या काळजाच्या तुकड्यासाठी झटत आहेत.
आठवड्यातून एक दिवस सुटी घेऊन कोणीतरी आपल्या मुलाला थोड्या दिवसांसाठी का होईना जीवनदान मिळवून देईल, या आशेने ते दात्यांचे दार ठोठावत आहेत.

Web Title: Father's struggle for the life of his dad!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.