भीती आणि अनिश्चितता अफवांना जन्म देते -डॉ. विश्वास खर्चे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 10:32 AM2020-03-29T10:32:31+5:302020-03-29T10:32:53+5:30

मानसोपचार तज्ज्ञ डॉ. विश्वास खर्चे यांनी व्यक्त केला.त्यांच्याशी साधलेला संवाद...

Fear and uncertainty give rise to rumors -Dr. Vishwas kharche | भीती आणि अनिश्चितता अफवांना जन्म देते -डॉ. विश्वास खर्चे

भीती आणि अनिश्चितता अफवांना जन्म देते -डॉ. विश्वास खर्चे

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा : कोरोनो संसर्गाचे जगातील थैमान भीतीदायक स्थिती व अनिश्चितता निर्माण करत असल्याने अफवांना जन्म मिळत आहे. त्यामुळे त्याच्या मुळाशी जावून त्यातील विश्वाहार्यता तपासण्याचे काम केले जावे. म्हणजे आपल्यातील भीती दुर होईल. अफवांमुळे काळजी व चिंता निर्माण होते. परंतू काळजी ही सकारात्मक माणूस करतो व त्यातून प्रतिबंधासाठी उपाययोजना करतो. मात्र चिंता करणारा व्यक्ती खचून जातो व चुकीच्या दिशेने जातो. त्यामुळे अशा स्थितत मानसिक संतुलन राखून स्वत:सोबतच कुटुंबासाठी घरात ठरावीक वेळ देणे गरजेचे असल्याचे मत जिल्हा सामान्य रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. विश्वास खर्चे यांनी व्यक्त केला.त्यांच्याशी साधलेला संवाद...

लॉकडाऊनमध्ये दिवसभराचे नियोजन कसे करावे?

होम लॉकडाऊनमुळे नागरिक वैतागले असून अनेकांना अकारण चिंता भासते आहे. सध्या लॉकडाऊनमुळे माणूस काहीसा वैतागत असला तरी त्याने यासंधीचा सकारात्मक वापर करावा. मानसिक संतुलन राखण्यासाठी स्वत:साठी काही काळ त्याने द्यावा. सोबतच कुटुंबासाठीही वेळ द्यावा. आपले जुने छंद जोपासावे. या संसर्गाच्या साथीत घरात राहून आपण स्वत:सोबत शासनालाच मदत करत आहोत.यामध्ये दिवसभराचा आपला आराखडा तयार करावा. घरातच एक तास हलका फुलका व्यायाम, थोडावेळ वाचन, काहीकाळ कुटुंबामध्ये समरस होणे, नातेवाईकांशी फोनवरून काही काळ गप्पा. केवळ टिव्हीसमोर त्याच बातम्या बघून नकारात्मकता येते.

अफवांबाबत काय सांगाल?

चिंता करणाºया व्यक्तीला सर्वत्र अनिश्चितता दिसते. त्यातून त्याला मिळणाºया माहितीतून अफवा निर्माण होतात. भीतीदायक गोष्टीकडे माणूस आकर्षीत त्यातून अफवा जन्मतात.

भावनिक नियमन म्हणजे काय़?

कोरोना संसर्गाच्या भितीमुळे अनेकजण चिंताग्रस्त झाले आहे तर काही या परिस्थितीचे शुल्लकीकरण करत आहे. दोघेही सामाजिक परिस्तिती बिघडविण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे अशा परिस्थिीतून मार्ग काढण्यासाठी भावनिक नियमन करण्याची गरज आहे. आहे त्या परिस्थितीतून मार्ग काढून राहता येणे हे खरे जीवन कौशल्य आहे. त्यासाठी निर्माण झालेल्या परिस्थितीचा संधी म्हणून उपयोग करा. कुटुंब व्यवस्थेचे महत्त्व समजून घ्यावे. शासनाकडून मिळणारे निर्देश हे सर्वांच्या स्व हितासाठीच आहेत. ते समजणे गरजेचे आहे.

लाईफ मिन्स हॅव्ह मोअर या संकल्पनेतून बाहेर पडण्याची ही नामी संधी लॉकडाऊनच्या रुपाने आपल्याला मिळाली आहे. त्यामुळे या परिस्थितीचा संधी म्हणून वापर करत कुटुंबाला वेळ द्यावा. आनंदी व सकारात्मक रहावे.अफवांची साखळीही ब्रेक करण्यासाठी माहिती विश्वासाहर्य स्त्रोताकडून असल्याची खात्रीकरून घ्या व अफवेला ब्रेक लावा - डॉ. विश्वास खर्चे

Web Title: Fear and uncertainty give rise to rumors -Dr. Vishwas kharche

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.