मोताळा तालुक्यात बर्ड फ्लूची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:37 AM2021-02-09T04:37:27+5:302021-02-09T04:37:27+5:30

मोताळा : तालुक्यातील सारोळापीर येथील मृत पक्ष्यांचा अहवाल बर्ड फ्लू पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये बर्ड फ्लूची ...

Fear of bird flu in Motala taluka | मोताळा तालुक्यात बर्ड फ्लूची भीती

मोताळा तालुक्यात बर्ड फ्लूची भीती

Next

मोताळा : तालुक्यातील सारोळापीर येथील मृत पक्ष्यांचा अहवाल बर्ड फ्लू पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये बर्ड फ्लूची भीती निर्माण झाली आहे. बर्ड फ्लूच्या एन्ट्रीमुळे पोल्ट्रीधारकही धास्तावले आहेत.

युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी राठोड

लोणार : तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी भारत राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मेहकर विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष यासीम कुरेशी यांनी एका नियुक्तीपत्राद्वारे ही नियुक्ती केली आहे.

शेतकरी विरोधी कायदे रद्द करा

डोणगाव : केंद्र शासनाने पारित केलेले तीन कृषी विधेयके मागे घेण्यासाठी जिल्हाभर आंदोलनाचे सत्र सुरूच आहे. याकडे लक्ष देऊन शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यात यावे, अशी मागणी मुरलीधर लांभाडे, राजेंद्र पळसकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

कबड्डी स्पर्धेचे आयोजन

इसोली : येथे खंडोबा यात्रेनिमित्त ११ फेब्रुवारीपासून कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये ५६ हजार रुपयांचे बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. या सामन्याचे प्रथम बक्षीस २१ हजार रुपये ठेवण्यात आले आहे.

बँक व्यवहार खोळंबले

बुलडाणा : शहरातील बीएसएनएलच्या इंटरनेट सेवेला ग्रहण लागलेले असतानाच शहरात ८ फेब्रुवारी रोजी सकाळपासून एका खासगी कंपनीची इंटरनेट सेवाही खंडित झाली होती. त्यामुळे दिवसभर बँकेतील व्यवहार खोळंबले होते.

कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा

बुलडाणा : येथे ५ फेब्रुवारी रोजी स्वतंत्र महाराष्ट्र कामगार संघटनेचा कार्यक्रम पार पडला. यावेळी कामगारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा रंगली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसटी कामगार संघटनेचे नेते राम हिवाळे हे होते.

क्रिकेट स्पर्धेला जि.प. अध्यक्षांची भेट

अमडापूर : चिखली तालुक्यातील उंद्री येथे सुरू असलेल्या क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्याला जिल्हा परिषद अध्यक्षा मनीषा पवार यांनी ६ फेब्रुवारी रोजी भेट दिली. जिल्हा परिषद अध्यक्षा मनीषा पवार यांनी चौकार मारत फलंदाजी केली.

पालखी मार्गावर फलक लावण्याकडे दुर्लक्ष

सुलतानपूर : शेगाव ते पंढरपूर या पालखी मार्गाचे काम प्रगतिपथावर आहे; परंतु या मार्गावर येणाऱ्या फाट्यावर गावाच्या नावाचे फलक लावण्यात आलेले नाही. वेणी, देऊळगाव कुंडपाळ फाट्यावर फलक लावण्याकडे दुर्लक्ष होत आहे.

वळणदार रस्त्यामुळे वाढला अपघाताचा धोका

बुलडाणा : चिखली रोडवर असलेल्या सव फाटा येथून पैनगंगा नदी गेलेली आहे. येथील रस्ता वळणदार असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. पूर्वी हा रस्ता सरळ होता; परंतु गेल्या काही दिवसांपासून रस्ता बदलल्यामुळे अपघाताच्या घटना वाढल्या आहेत.

घंटागाडीवरील जीपीएसचा प्रश्न ऐरणीवर

मोताळा : शहरातील एकूण १७ प्रभागांमधील कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी घंटागाडीवर जीपीएस यंत्रणा लावण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नगर पंचायतीने शहरातील कचरा जमा करण्यासाठी घंटागाड्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे; परंतु त्यावर जीपीएस लावण्यात आलेले नाही.

बुलडाणा ते खामगाव रस्त्याचे होणार डांबरीकरण

बुलडाणा : बुलडाणा ते खामगाव या रस्त्याचे डांबरीकरण व मजबुतीकरण करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होती. दरम्यान, या रस्त्याच्या मजबुतीकरणाला मुहूर्त मिळाला आहे. राष्ट्रीय महामार्ग ईपीसी मोडअंतर्गत या रस्त्याचे काम करण्यात येत आहे.

देऊळगाव मही येथे तीन पॉझिटिव्ह

देऊळगाव मही : देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगाव मही येथे रविवारी तीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यांना देऊळगाव राजा येथील कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले. ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्ण आता वाढत आहेत.

Web Title: Fear of bird flu in Motala taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.