शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये कोरोनाची धास्ती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 10:51 AM2020-05-26T10:51:40+5:302020-05-26T10:55:51+5:30
कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने आता शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाणाºया शेतकºयांमध्येही धास्ती वाढली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : खामगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जिल्हाभरातून शेतमाल विक्रीसाठी जातो. त्यामुळे खामगावशी अनेक शेतकºयांचा संपर्क येतो. खामगावपासून सुमारे पाच कि़मी. अंतरावर असलेल्या जळका भडंग येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने आता शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाणाºया शेतकºयांमध्येही धास्ती वाढली आहे. बाजार समितीमध्ये होणारी गर्दी पाहता कोरोना विषाणू संसर्गाचा धोका वाढत आहे.
जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण पुन्हा वाढण्यास सुरूवात झाली आहे. कोरोना बाधित रुग्णाचा पहिला मृत्यू २८ मार्च रोजी झाल्यानंतर सुरूवातीच्या टप्प्यात सातत्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. दरम्यान, मध्यंतरी सर्व रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह येत असल्याने जिल्हावासियांना दिलासा मिळाला होता. त्यानंतर पुन्हा जळगाव जामोद येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला. टप्प्या-टप्प्याने घाटाखाली कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. दरम्यान, खामगाव तालुक्यातील जळका भडंग येथे आठ जण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. आता याठिकाणी नऊ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. खामगाव येथे मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. त्यामुळे याठिकाणी खामगाव तालुक्यासह मेहकर, लोणार, बुलडाणा, चिखली व इतर तालुक्यातूनही शेतमाल विक्रीसाठी येत असतो. लॉकडाउनमुळे अनेक शेतकºयांचा शेतमाल घरात पडून होता. दरम्यान, लॉकडाउनच्या नियमामध्ये शिथिलता दिल्याने अनेक शेतकºयांनी आपला शेतमाल विक्रीसाठी काढला. परंतू खामगावपासून जवळ असलेल्या जळका भडंग येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने माल घेऊन येणाºया शेतकºयांमध्ये भिती आहे.
गावातील नागरिकांचा खामगावशी संपर्क
खामगाव तालुक्यातील जळका भडंग सारख्या छोट्याश्या पॉझिटिव्ह असल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झालेली आहे. या गावातील नागरिकांचा पिंपळगाव राजा व खामगाव शहराशी सातत्याने संपर्क येतो. या गावातील नऊ कोरोना बाधीत रुग्ण हे खामगाव येथील आयसोलेशन कक्षामध्ये दाखल करण्यात आले आहेत त्यांच्यावर खामगाव याठिकाणीच उपचार सुरू आहेत. हे पॉझिटिव्ह रुग्ण आणखी कोठे-कोठे गेले याचा शोध घेण्यात येत आहे.