भीतीदायक अफवा दुप्पट वेगाने पसरतात; मानसोपचार तज्ज्ञाचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 03:17 PM2018-07-06T15:17:38+5:302018-07-06T15:21:41+5:30

‘अफवांचा उगम आणि त्यावर नागरिक विश्वास का ठेवतात’ या संदर्भात मानसोपचार तज्ज्ञ डॉ. विश्वास खर्चे यांच्याशी चर्चा केली असता भितीदायक अफवा या दुप्पट वेगाने पसरत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

Fearful rumors spread rapidly; Psychiatry expert | भीतीदायक अफवा दुप्पट वेगाने पसरतात; मानसोपचार तज्ज्ञाचे मत

भीतीदायक अफवा दुप्पट वेगाने पसरतात; मानसोपचार तज्ज्ञाचे मत

Next
ठळक मुद्देअफवेची व्याख्याच बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत मानसोपचार तज्ज्ञ डॉ. विश्वास खर्चे यांनी मांडली. समाज धारणेच्या आधारावर एखादी गोष्ट किंवा माहिती ही खरी समजून नागरिकांकडून तिचा प्रसार केला जातो.प्रामुख्याने चमत्कार आणि भीती यातून अफवांना पेव फुटतात असे डॉ. खर्चे म्हणाले.

- नीलेश जोशी

बुलडाणा : अफवांमुळे धुळे जिल्ह्यात पाच जणांचा जमावाने बळी घेतल्यानंतर बुलडाणा जिल्ह्यातही अपहरण करून किडणी काढण्याच्या संशयावर मोताळा तालुक्यातील पिंप्री गवळी येथे जमावाने तिघांना मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना बुधवारी उघडकीस आली होती. त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ‘अफवांचा उगम आणि त्यावर नागरिक विश्वास का ठेवतात’ या संदर्भात मानसोपचार तज्ज्ञ डॉ. विश्वास खर्चे यांच्याशी चर्चा केली असता भितीदायक अफवा या दुप्पट वेगाने पसरत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मुळात अपुऱ्या माहितीवर काढलेला निष्कर्ष म्हणजेच अफवा होय, अशी साधी सरळ अफवेची व्याख्याच बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत मानसोपचार तज्ज्ञ डॉ. विश्वास खर्चे यांनी मांडली. बर्याचदा आपला समज अथवा समाज धारणेच्या आधारावर एखादी गोष्ट किंवा माहिती ही खरी समजून नागरिकांकडून तिचा प्रसार केला जातो. त्यातून अशा अफवा उगम पावतात, असे ते म्हणाले. प्रामुख्याने चमत्कार आणि भीती यातून अफवांना पेव फुटतात असे डॉ. खर्चे म्हणाले. चमत्काराच्या अफवेसंदर्भात ‘गणपती दुध पितो’ हे चपखल उदाहरण त्यांनी दिले तर भीतीदायक अफवा म्हणजेच धुळ््यीतील मुले पळविणारी टोळी आल्याची आणि बुलडाणा जिल्ह्यातील पिंप्री गवळी येथील अपहरण करून किडणी काढणारी टोळी आल्याची अफवा होय,असे ते म्हणाले. समाजामध्ये काही बाबतीत आपण आपली विशिष्ट बाबींची प्रतिमा गृहीत धरून कृती करत असतो. धुळे जिल्ह्यातील घटना आणि बुलडाणा जिल्हयातील अपहरण करून किडणी काढण्याची अफवा त्या संदर्भात पूर्व माहिती काढण्याआधीच त्या संदर्भात मनात निर्माण केलेली प्रतिमा संबंधीत बाबींची शहानिशा न करताच आपल्याकडील इनपूट टाकून नागरिक जेव्हा ती पुढे पाठवतात तेव्हा त्यातून अफवा जोर पकडते. आपल्या लगतच्या वर्तुळातील लोकांसाठी आपण विश्वसनीय असतो. त्यामुळे सोबतचे लोक लगेच त्यावर विश्वास ठेवतात आणि ही अफवा दुप्पट वेगाने पसरते. त्यात भीतीदायक अफवेचा वेग अधिक असतो. भीतीपोटी व्यक्ती आक्रमक होतो आणि मग अन्य लोकही त्याच्या कृतीचे अनुकरण करतात. जमाव आक्रमक होतो आणि असा जमाव शांत करणे अवघड होऊन बसते. त्यामुळे अशा बाबींची विश्वासर्ह्यता तथा सोशल मिडीयावरील संदेशाची विश्वसनीयता तपासणे गरजेचे असते. मात्र अशा परिस्थितीत पूर्वाश्रमीच्या धारणेवरून संबंधीत अफवेची विरुद्ध बाजू गृहीत धरल्या जात नाही. आणि ती पसरते. वानगी दाखल श्रीदेवीचा मृत्यू बाथ टबमध्ये पडून झाला. तो कसा झाला, तीने मद्य प्यायले होते का? इथ पासून ते प्रत्यक्षात त्या खोलीत काय घडले याची प्रतिमाच माध्यमातील बातम्यांवरून प्रेक्षकांनी मनात गृहीत धरून त्यावर तर्कवितर्क लढविल्या गेले. त्यातून तिच्या मृत्यूसंदर्भातही अफवा पसरल्या गेल्या होत्या, असे डॉ. खर्चे म्हणाले. त्यामुळे आपल्याला मिळणार्या माहितीची आधी सत्यता अर्थात विश्वसनियता तपासणे आवश्यक आहे. त्याची सकारात्मक आणि नकारात्मक बाजू तपासणे आवश्यक आहे. धुळे, पिंप्रीगवळी प्रकरणात तशा बाबीच तपासल्या गेल्या नाहीत. सोबतच अशा भीतीदायक अफावांमध्ये गुन्हेगाराच्या बाबतीत पोलिसांनी नोंद केली आहे का? पोलिसांनी त्याबाबत काही सुचना दिली आहे का? याचीही तपासणी करणे असे भीतीदायक संदेश प्राप्त झाल्यानंतर ते सोशल मिडीयातून पुढे पाठवतांना आवश्यक आहे. बर्याचदा भितीदायक स्थितीतून मार्ग काढण्याचा किंवा त्या स्थितीतून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करणे हा मानवी स्वभाव आहे. त्यातूनच अफवा पसरविण्यास हातभार लागतो, असेही डॉ. खर्चे यांनी अधोरेखीत केले.

सोशल मिडीयाचा सकारात्मक वापर व्हावा!

सोशल मिडीयाचाही सकारात्मक वापर होणे आवश्यक आहे. तंत्रज्ञान हे वाईट नसते. परंतू ते कशा पद्धतीने हाताळल्या जाते यावर त्याचे चांगले वाईट परिणाम अवलंबून असतात. धुळ््यासारख्या घटनेते अफवा सोशलमिडीयावर वेगाने पसरल्याने दुर्देवी घटना घडली. मात्र अशा या तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर झाल्यास त्याचे परिणामही चांगले होतात. वानगीदाखल बुलडाणा जिल्ह्यातील विनोद बोरे हे सोशल ‘मिडीयावर पडद्यामागचे नायक’ या सदरामध्ये प्रेरणादायक, सकारात्मक बाबी घेऊन यशस्वी लोकांच्या कथा टाकत आहेत. त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय. शैक्षणिक क्षेत्रातही आज सोशलमिडीयाचा सकारात्मक वापर होत आहे. तंत्रज्ञानामुळे मानवी जीवन सुखकर झाले.या तंत्रज्ञान वापरण्यासाठी आपण अपडेट झालो. पण धुळे, पिंप्री गवळी सारख्या घटना टाळण्यासाठी हे तंत्रज्ञान हाताळण्याचे कौशल्य आत्मसात करण्यासाठी सामाजिक अपग्रेडेशनचीही या निमित्ताने गरज निर्माण झाली आहे.

Web Title: Fearful rumors spread rapidly; Psychiatry expert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.