खाद्यतेलाचे भाव वाढल्याने फाेडणी महागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:37 AM2021-05-20T04:37:21+5:302021-05-20T04:37:21+5:30

धामणगाव धाड : एकीकडे नागरिक कोरोनाच्या संकटामुळे हतबल झाले, तर दुसरीकडे कडक निर्बंध आणि दरराेजच्या उपयोगात येणारे खाद्यतेल, गॅस ...

Fedani became more expensive due to rise in edible oil prices | खाद्यतेलाचे भाव वाढल्याने फाेडणी महागली

खाद्यतेलाचे भाव वाढल्याने फाेडणी महागली

Next

धामणगाव धाड : एकीकडे नागरिक कोरोनाच्या संकटामुळे हतबल झाले, तर दुसरीकडे कडक निर्बंध आणि दरराेजच्या उपयोगात येणारे खाद्यतेल, गॅस सिलिंडर, पेट्रोल, अशा अनेक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. यात सर्वसामान्य व्यक्ती मात्र नाहक होरपळून जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य गृहिणीसुद्धा चिंता व्यक्त करताना दिसत आहेत.

सोयाबीन तेलाची किंमत गेल्या वर्षभरात दुप्पट होऊन आता १६५-१७० प्रतिकिलोच्या दराने विक्री होत आहे. दिवसागणिक तेल व संसारोपयोगी वस्तूंच्या वाढत्या किमतीने गृहिणी तथा सामान्यांचे बजेट कोलमडले आहे.

गतवर्षी सोयाबीन तेलाची किंमत प्रतिकिलो ८० ते ९० च्या घरात होती. आता मात्र सरळ १७० वर गेली आहे आणि तशी विक्रीसुद्धा सुरू आहे. त्यामुळे फोडणी पाण्याची की तेलाची द्यायची, असेही बोलले जात आहे. अन्य खाद्यतेलाचे दर नेहमीच उच्चांकी असल्याने ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोक सोयाबीन तेलाला पसंती देतात. तेच आता अधिक महागल्याने घरखर्च कसा भागवायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे हाताला काम नाही, तर दुसरीकडे ज्या भरवशावर कसा तरी संसाराचा गाडा चालतो तोही बंद आणि तिसरीकडे महागाई आणि याहीपेक्षा कोरोनाचे संकट काय करायचे कळेनासे झाले आहे. एकेकाळी ग्रामीण भागातील ग्रामस्थ जवस तेल वापरत असत; परंतु आता शेतात जवस पीक त्या प्रमाणात शेतकरी घेत नाहीत आणि आधीसारख्या जवस तेलाच्या गिरण्यासुद्धा जिल्ह्यात बोटावर मोजता येतील एवढ्याच दिसतात. आधी शुद्ध तेल खायला मिळत होते; पण आज तसे काहीच मिळत नसल्याची खंत बरेच शेतकरी व ग्रामस्थ व्यक्त करताना दिसत आहे. आता सोयाबीन तेल फिल्टर होऊन येत असल्याचे बोलले जात असले तरी कोणत्या ब्रॅण्डचे किती शुद्ध तेल, यावरही विचार केला जात आहे.

Web Title: Fedani became more expensive due to rise in edible oil prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.